ताज्या बातम्याराजकारण

बनावट जातीच्या दाखल्याप्रकरणी भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना पंधरा दिवस मुदत

जात वैधता समिती पुढे १७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी

सोलापूर (बारामती झटका)

भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभा निवडणूक अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणावर समाज कल्याण विभागात जात वैधता समिती समोर सुनावणी सुरू आहे. बुधवारी स्वामी यांच्या वतीने दोन महिन्यांची मुदत मागितली. मात्र, समितीने ती फेटाळत पंधरा दिवसांची मुदत दिली‌.

स्वामी यांना मुदत देण्याची गरज नसल्याचे सांगत तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला. पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. स्वामी यांनी बोगस दाखला वापरून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, अशी तक्रार त्यांचे विरोधी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली. समितीने सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार समितीपुढे सुनावणी सुरू आहे‌.

बुधवारी प्रमोद गायकवाड, नितीन मुळे आणि कंदकुरे हजर झाले. खासदारांच्या वकिलांनी दोन महिन्याच्या मुदतीत कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मागितली.

स्वामी हजर का होत नाहीत ?
डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी सुनावणीसाठी एकदाही समिती पुढे हजर झाले नाहीत. त्यांचा जातीचा दाखला सादर का करत नाही, असे प्रश्न विचारले पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली. – प्रमोद गायकवाड, तक्रारदार

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort