भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी ॲड. सुजित थिटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता
विविध ठिकाणी प्रभारी पदावर पक्षवाढीसाठी संघटन कौशल्याची चुणूक दाखवली
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असणारे ॲड. सुजित थिटे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. महाराष्ट्रभरचा प्रवास करून पक्ष वाढीसाठी भरीव काम केलेले आहे. त्यामुळे प्रभारी म्हणून पुणे जिल्हा ग्रामीणचे जबाबदारी दिलेली होती.
गोवा विधानसभा निवडणुकीला सालेगाव विधानसभेची प्रभारी म्हणून जबाबदारी होती. परराज्यात सुध्दा कार्याची चुणूक ॲड. सुजित थिटे यांनी दाखवली होती.

सध्या सांगली शहराला प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. भाजप संघटात्मक पक्षाची अनुभव आणि होतकरू असे युवा नेतृत्व असणारे ॲड. सुजित थिटे हुशार व संघटनात्मक असणारे कायदे पंडित असणारे युवा नेतृत्व ॲड. सुजित थिटे यांची भाजप सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.
माळशिरस तालूक्यातील उंबरे वेळापूर या गावचे ते रहिवासी आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये पदवीधर संघटन उभा केलेले होते. नाळ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून राजकीय व सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत अनुभवाचा फायदा होईल, यासाठी वरिष्ठ पक्षातील नेतेमंडळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
