ताज्या बातम्या

चाकोरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र कस्तुरे तर व्हाईस चेअरमनपदी अभिमन्यू गायकवाड यांची निवड..

माळशिरस (बारामती झटका)

चाकोरे ता. माळशिरस, येथील चाकोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. रामचंद्र महादेव कस्तुरे व व्हाईस चेअरमन पदी अभिमन्यू साहेबराव गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी चाकोरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुरेशआबा पाटील, माजी चेअरमन दादासाहेब पाटील, माजी चेअरमन लक्ष्मणराव शिंदे, माजी चेअरमन महादेव माने, विकास सेवा सोसायटीचे संचालक हनुमंत ननवरे, गंधाराभाई कोळेकर, ज्योतीताई लोंढे, माजी चेअरमन मोहन गायकवाड, लक्ष्मण तात्या मिटकरी, सदाशिव नरहरी पाटील, आजिनाथ कस्तुरे, किराण भांगे, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी गावातील आजी-माजी पदाधिकारी व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भावी कारकीर्दीसाठी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button