चळवळीच्या कट्टर भिमसैनिकांस दादामामा नामदास वाढदिवस अभीष्टचिंतन..
अकलूज (बारामती झटका)
चळवळीच्या धगधगत्या निखार्यातून फुले-शाहु-आंबेडकरांचे विचार जनमाणसाच्या हृदयात भिडवणारे दादामामा नामदास शंकरनगर-अकलुज यांचा आज वाढदिवस..
जात, धर्म, पंत याच्यापलिकडील असामान्य माणुस शंकरनगर अकलुज येथे आपल्या छोटेखानी व्यवसाय चालवणारे दादामामा नामदास. लहानपणी वडीलांचे छत्र हरपले. मुळचे म्हसवड येथील पण बालपण कोंडबावी गावच्या मातीत एकरूप झालं.
कोंडबावी ता. माळशिरस, हेच गाव. पोटाची खळगी भरण्यासाठी दारिद्र्याच्या चिंध्या पांघरून वेगळ्या ध्येयाने व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या दादामामा यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यातच लग्न झालेले. शंकरनगर येथे भाड्याची खोली करून अकलुज येथील रिक्षा स्टॉपवर हजेरीत रिक्षा चालवायचे व येणाऱ्या पैशातून कुटुंब चालवायचे हा त्यांचा दिनक्रम…
एके दिवशी रिक्षा वाल्यास सदाभाऊ चौक येथे कोणीतरी मारतंय (साधारण वीस वर्षापूर्वीच) एकही रिक्षावाला त्याला सोडवायला आला नाही. त्यावेळेस अन्यायाविरुद्ध लढण्याच्या बाबासाहेबांच्या विचारधारेने झपाटलेल्या दादामामा नामदास यांनी क्षणार्धात तिकडे धाव घेऊन रीक्षावाल्या बांधवांची सोडवणूक करून वाद क्षणार्धात मिटवला व कोणीतरी गडावर निरोप दिला, जनसेवा रीक्षा स्टॉपवर एक वाघ आलाय.. लागलीच गडावरून निरोप आला घेऊन या त्याला गडावर. का आणि कशाला बोलावलंय, आता काय होणार.. शिक्षा मिळणार अश्या असंख्य प्रश्नांनी दादामामा भयभीत झाले. गडावर जाताच समोर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब. समोर दादामामाचा घामाने डबाबलेला चेहरा पाहून पप्पासाहेब म्हणाले, नाव काय तुझं…? दादामामा पुटपुटत म्हणाले, दादासाहेब नामदास.. पप्पासाहेब म्हणाले, राहतोस कुठे.. मामा थरथर कापत म्हणाले, शंकरनगरला.
अरे व्वा.. शाब्बास पठ्ठ्या. ज्या रीक्षा स्टाॅपला जनसेवा हे नाव आम्ही दिले पण, रीक्षावाल्यावरील अन्यायाविरुद्ध तु लढला. जा, आजपासून जनसेवा रीक्षा स्टॉपचा तु अध्यक्ष. दादामामा यांना पप्पासाहेब यांच्याकडून मिळालेल वाघाचं बळ.
पुढे दलित चळवळीतही सक्रिय होउन दादामामा नामदास पॅंथरच्या काळात नंदकुमार केंगार, पी. एस. गायकवाड अशा त्यावेळी नेत्यांसोबत राहीले व हळुहळु आपल्या कौशल्याने बहुतांशी नाळ जोडत गेले. नंतर प्रामुख्याने स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांच्या निधनानंतर डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत त्याच उमेदीने लढत आहेत..
दलित चळवळीत वावरताना विकासदादा धाईंजे तसेच मिलिंद सरतापे, होलार समाज, मातंग समाज आदी बहुजन समाजातील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आजही पहायला मिळतात.
स्वतःचं घर मुल, बहीण, भाऊ असा परिवार दादामामा. यांचा स्थायिक शंकरनगर येथील अर्जुननगर येथे झाला. .
वय वाढलं पण मन तरूण असल्याची त्यांचे विचार जगण्यास प्रेरणा देतात. रागीट व काहीशा चिडखोर स्वभावाचे दादामामा प्रेमळही तितकेच..
कोण वारले असेल व मामांना निरोप गेला तर क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी जाणे. तिसरा, दहाव्याच लोक जेवत नाहीत पण मामा आवर्जुन तेथे जेवण करतात. एक काळ आठवा याच अन्नासाठी कित्तेक पिढ्यांनी गुलामगिरी भोगली व ज्या बापाने माणसांत बसवले त्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालण्याची व जुनाट प्रथा मोडीत काढण्यासाठी दादामामा गावोगावी फिरले. यावेळी एकदा अशाच अवलिया माणुस माजी खासदार राजु शेट्टी साहेब यांच्या निवासस्थानी दादामामा मुळे जाण्याचा प्रसंग आला व साधी राहणी असलेली व्यक्ती शेट्टी साहेब व दादा मामांना एकत्र पाहुन धन्य झालो..
नंतर गेल्याच वर्षी माळशिरस येथील बुद्धविहार या ठीकाणी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच बौद्ध पद्धतीने लग्न केले व सर्व बहुजन वंचित समाजासमोर एक आदर्श ठेवला.
सध्या साखरेच्या आजाराने थोडे थकलेत पण वाघाच्या डरकाळीचा आवाज तसाच आहे. (मी दादामामा यांच्या सोबत अनेक दिवस फिरलो. त्यांचा सहवास लाभला यातुन वेळोवेळी ते त्यांच्या आयुष्यातील गोष्टी मला सांगायचे काहीत बदल असु शकतो.) त्यांना पुढील निरमय निरागस आयुष्यासाठी या वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा. .
पत्रकार सचिनभाव करडे, खुडूस. मो..7020658731
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.