ताज्या बातम्याशैक्षणिक

चांदापुरी ग्रामस्थांच्यावतीने एम. टेक. उत्तीर्ण तेजस्वीनी लोखंडे हिचा सत्कार

चांदापुरी (बारामती झटका)

चांदापुरी ग्रामस्थांच्या वतीने एम. टेक. उत्तीर्ण कु. तेजस्वीनी बापु लोखंडे हिचा सत्कार करणेत आला. यावेळी सरपंच जयवंत आण्णा सुळ, उपसरपंच तात्यासाहेब चोरमले, शाहिद शेख, हणमंत सरतापे, आण्णा भोसले, विजय पाटील, बापु लोखंडे, महादेव सरवदे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

कु. तेजस्विनी लोखंडे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. जिद्द, मेहनत आणि अपार कष्ट यामुळे तिने हे यश संपादन केले. एक.टेक. होवून तिने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असल्याच्या भावना यावेळी तिने व्यक्त केल्या. कु. तेजस्विनी हिच्या यशाबद्दल तिच्यावर परिसरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button