चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार…

धर्मपुरी (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात धर्मपुरी येथे फुट मसाजची चरणसेवा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या चरणसेवा केंद्रातील वारकरी बांधव यांच्याशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधला. स्वयंचलित फुट मसाजमुळे चालून चालून थकलेल्या पायांना आराम मिळत असल्याने या सेवेवर वारकरी खूप खुश आहेत.

जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी सर्वाधिक फुट मसाजवर वारकरी यांच्यासाठी वेळेत उपलब्ध करून दिले आहेत. धर्मपुरी, कारूंडे बंगला, शिंगणापूर फाटा, तसेच सर्व मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षात हे फुट मसाजर बसविण्यात आले आहेत. या सर्व केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी भेट देऊन वारकरी यांच्याशी संवाद साधला. सिईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व त्यांच्या टीमने लक्ष घालून कमी कालावधीत मोहिम पध्दतीने चरण सेवेसाठी फुट मसाजर उपलब्ध करून दिले आहेत. प्रशिक्षणासह १५० पेक्षा अधिक कर्मचारी या चरणसेवेसाठी तैनात करणेत आले आहेत.

चरणेसेवेसाठी रांगा
आळंदी ते धर्मपुरी १४० किमीचा पायी प्रवास करून थकलेले पाय मशीनद्वारे दाबून घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत.
महिलांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आलेला आहे…
वृध्द भाविकांची चरण सेवेसाठी झुंबड उडाली आहे. विशेषतः महिला भाविकांची संख्या अधिक आहे. बंदोबस्तासाठी आलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी देखील या चरणसेवेचा लाभ घेत आहेत. या चरण सेवेसाठी कक्ष अधिकारी अविनाश गोडसे व कक्ष अधिकारी झेड. ए. शेख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.