ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

“चर्चा तर होणारच” विद्यमान आमदार यांच्या गावातीलच शेतकऱ्यांचे माजी आमदार यांनी उपोषण सोडवले….

वेळापूर येथील शेतकरी महादेव यांच्या मदतीला लोकप्रतिनिधी राम धावून आले….

वेळापूर (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन व ज्येष्ठ नेते महादेवभाऊ ताटे यांच्यासह वेळापूर पंचक्रोशीतील शेतकरी बांधव पाण्यासाठी उपोषणास बसलेले होते. उपोषणकर्त्यांसमवेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवून उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आलेले आहे. विद्यमान आमदार यांच्या गावातीलच शेतकऱ्यांचे माजी आमदार यांनी उपोषण सोडवले असल्याने “चर्चा तर होणारच…” वेळापूर येथील शेतकरी महादेव यांच्या मदतीला लोकप्रतिनिधी राम धावून आले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

उपोषणकर्त्यांची हकीकत अशी की, वेळापूर येथे माळखांबी मायनर वरील लाभार्थी शेतकरी दि. 8/4/2025 रोजी सकाळी 7 वाजले पासून महादेव भाऊ ताटे, विजय पांढरे, अजित बनकर, शिवाजी मोहिते, भागवत गायकवाड, धनंजय माने देशमुख, नारायण जंगले, आत्माराम काळे, अभयकुमार जगदाळे, गोपाळ आबा क्षिरसागर, युवराज पिसे व इतर लाभधारक शेतकरी पाटबंधारे विभाग ऑफिस वेळापूर येथे उपोषणाला बसले होते. दि. 9/04/2025 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांनी उपोषण स्थळी भेट देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दि. 11/4/2025 रोजी मायनरला पुर्ण क्षमतेने पाणी सोडणार असे ठोस आश्वासन दिले व उपोषण करणार्या महादेव भाऊ ताटे यांना नारळपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.

उपोषण स्थळी वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमरभाऊ माने देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रमभाऊ माने देशमुख, युवा नेते स्वप्नील माने देशमुख, भाजप युवा नेते पिनू भाऊ येडगे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओंकार खराडे, आकाश देवकते अर्जुन देवकते यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

उपोषण कर्ते श्री. महादेव भाऊ ताटे व उपस्थित शेतकरी यांची प्रमुख मागणी आहे, नीरा उजवा कालवा डि फोर फाटा व माळखांबी मायनर वरील शेतकऱ्यांचा अन्याय दूर व्हावा. पाटबंधारे खात्याकडून आमच्यावर होणारा अन्याय कालवा सल्लागार समिती बैठकीत मांडून अन्याय दूर करावा, अशी विनंती केली. त्यामध्ये प्रमुख मुद्दे डि फोर फाटा हा 150 क्युसेस ने चालू करून डी फोर फाटा व माळखांबी मायनर चे सिंचन सोबत चालू करण्यात यावे. माळखांबी मायनर हेडला डि फोर फाटा वर CR Gate गेट बांधून मिळावे, निरा उजवा कालवा ब्रँच १ सोबतच डिफोर चे सिंचन ही चालू व्हावे, डिफोर फाटा वाढवून माळखांबी मायनरचे सिंचन चालू करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता फलटण यांना द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांच्या होत्या.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपोषणकर्त्यांच्या समोरच शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढून महादेव भाऊ ताटे व समस्त शेतकरी यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडविले असल्याने लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्या विषयी शेतकऱ्यांमध्ये समाधानचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
08:43