मोहिते पाटील गटाच्या पश्चिम भागातील नेत्याच्या राजकीय भूकंपाने पूर्व भागातील अकलूज नगर परिषद हादरली…

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील गटाचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला…
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करून मी निर्णय घेणार असे सांगितले होते. त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी बैठकीच्या आयोजन केले होते. माजी आमदार राम सातपुते यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे किती ताकद आहे, हे माझ्या डोळ्याने पाहिले. मुख्यमंत्री राम सातपुते यांचा एकही शब्द मोडत नाहीत, नातेपुते शहरासह नातेपुते परिसराच्या विकासासाठी वेगवेगळ्या कामासाठी निधी आणून या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर काम करणार असल्याचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांनी जाहीर केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील देशमुख यांनी केले.


यावेळी विचार विनिमय संदर्भात धैर्यशील देशमुख, सतीश सपकाळ, ॲड. शिवाजीराव पिसाळ, ॲड. डी. एन. काळे, बाहुबली चंकेश्वरा, महेश शेटे, कैलास बरडकर, एन. के. साळवे, बशीर काझी, सागर इंगोले, किशोर पलंगे, प्रकाश साळवे मा. ग्रा. सदस्य अभिजित वाळके, धनंजय भोसले, धोंडीराम पलंगे, विठ्ठल पिसे, मेजर अनिल माने, राहुल पद्मन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित धैर्यशील देशमुख, अमरशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, हेमंत देशमुख, धनाजी देशमुख, मालोजीराजे देशमुख रणवीर देशमुख, अभय देशमुख, रत्नसिंह देशमुख, अमोल उराडे, जवाहर इंगोले, दशरथ ठोंबरे, गणेश पागे, वामन पलंगे, अर्जुन जठार, अरविंद पाठक, गणेश पागे, आदेश पांढरे, सुधीर इंगोले, बाळासाहेब पांढरे, निजाम काझी, गणपतराव वाघमोडे, जनार्दन सोरटे, संतोष काळे, राजेश चंकेश्वरा, चंद्रकांत काळे, डॉ. प्रशांत गांधी, डॉ. देशपांडे, युवराज वाघमारे, देशमुख परिवार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मुधोजीराव तथा नानासाहेब देशमुख यांनी काम केले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांनी काम केले. विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख यांनी काम केले. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते पाटील यांचे राजकारण देशमुख परिवार व देशमुख गटाने सांभाळलेले होते. बाबाराजे देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मोहिते पाटील गटाला खिंडार पडल्यासारखे आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते पाटील गटाच्या बड्या राजकीय नेत्यांनी राजकीय भूकंप केलेला आहे. याची झळ निश्चितपणे अकलूज नगर परिषदेला बसणार आहे, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



