चर्मकार विकास संघाच्या तालुकाध्यक्षपदी राहुल गवळी यांची नियुक्ती

माळशिरस (बारामती झटका)
चर्मकार विकास संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी उघडेवाडी ता. माळशिरस, येथील राहुल तानाजी गवळी यांची निवड करण्यात आली आहे. संत रविदास महाराज मंदिर, पुणे-सोलापूर रोड, भुईंजे (ता. माढा) येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष संजय खामकर साहेब, संत रविदास महाराज मंदिर भुईंजेचे संस्थापक राजाभाऊ शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे, महिला प्रदेश कार्याध्यक्षा पूजा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय गवळी व उघडेवाडी गावच्या सरपंच जिजाबाई गवळी यांच्या उपस्थितीत राहुल गवळी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.


सदर पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, आपण सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीतून चर्मकार समाजाच्या सुखदुःख, विकास, न्याय हक्क व सन्मानाच्या सर्व स्तरावर कार्यरत आहात. आपण केलेल्या सर्वांगीण कार्याचा विचार करून यापुढे चर्मकार विकास संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदावर पुढील आदेशापर्यंत नेमणूक करण्यात आली आहे. आपणांस नियुक्ती केलेल्या पदाची जबाबदारी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार व समाज हिताच्या कार्यातून पदाला योग्य न्याय देऊन यशस्वीपणे कार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करून भावी सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी माळशिरस तालुका अध्यक्षपदी अनिता बनसोडे तर संघटक पदी यल्लाप्पा बाबुराव लोखंडे यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.