ताज्या बातम्यासामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर योजनेचे तहसील कार्यालयाकडून स्तुत्य नियोजन..

सर्व प्रकारचे दाखले संजय गांधी निराधार योजना पी एम किसान योजना संबंधित नागरिकांचे तक्रार निवारण होणार…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र शासनाचे निर्देशाअन्वये मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुरेश शेजुळ व निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, तहसील कार्यालय माळशिरस कार्यालयाकडून स्तुत्य नियोजन केलेले आहे. सदरच्या शिबिरामध्ये माळशिरस तालुक्यातील नागरिकांना रहिवाशी, उत्पन्न, जातीचे व इतर सर्व प्रकारचे दाखले सुलभ रित्या उपलब्ध व्हावेत तसेच संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना संबंधित नागरिकांचे तक्रार निवारण होणार आहे. त्या अनुषंगाने शिबिराचे आयोजन मंडल निहाय केलेले आहे. माळशिरस मंडलमध्ये दि. 16/05/2025 रोजी श्री खंडागळे मंडल अधिकारी यांच्या नियंत्रणात महसूल भवन माळशिरस येथे होणार आहे.

अकलूज मंडलमध्ये दि. 16/05/2025 रोजी श्रीमती लकडे, मंडळ अधिकारी अकलूज यांच्या नियंत्रणात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे संपन्न होणार आहे. खुडूस मंडल मध्ये दि. 16/05/2025 रोजी श्री भोसले मंडल अधिकारी खुडूस यांच्या नियंत्रणात महालिंगेश्वर हायस्कूल खुडूस येथे संपन्न होणार आहे. दि. 16/05/2025 रोजी श्री एकतपुरे मंडल अधिकारी पिलीव यांच्या नियंत्रणात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव येथे संपन्न होणार आहे.

इस्लामपूर मंडलमध्ये दि. 16/05/2025 रोजी श्री. रणदिवे मंडलाधिकारी इस्लामपूर यांच्या नियंत्रणात संभाजी बाबा विद्यालय इस्लामपूर येथे संपन्न होणार आहे. महाळुंग मंडल मध्ये दि. 16/05/2025 रोजी श्री. लोखंडे मंडळ अधिकारी महाळुंग यांच्या नियंत्रणात जिल्हा परिषद शाळा महाळुंग येथे संपन्न होणार आहे. सदाशिवनगर मंडळ मध्ये दि.16/05/2025 रोजी श्री‌. घुगे मंडलाधिकारी सदाशिवनगर यांच्या नियंत्रणात जिल्हा परिषद शाळा लोणंद येथे संपन्न होणार आहे. दहिगाव मंडल मध्ये दि. 19/05/2025 रोजी श्री. ठाकरे मंडल अधिकारी दहिगाव यांच्या नियंत्रणात मारुती मंदिर परिसर पिरळे येथे संपन्न होणार आहे. नातेपुते मंडल मध्ये दि. 20/02/2025 रोजी सीबी लोखंडे मंडल अधिकारी नातेपुते यांच्या नियंत्रणात मोरजार्ई विद्यालय मोरोची येथे संपन्न होणार आहे. वेळापूर मंडल मध्ये 20/05/2025 रोजी श्री एम पी चव्हाण मंडल अधिकारी वेळापूर यांच्या नियंत्रणात हनुमान मंदिर सभागृह तोंडले येथे संपन्न होणार आहे. लवंग मंडल मध्ये20/05/2025 रोजी श्री फिरमे मंडळ अधिकारी लवंग यांच्या नियंत्रणात मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर येथे संपन्न होणार आहे. फोंडशिरस मंडल मध्ये 20/05/2025 रोजी श्रीमती दराडे मंडल अधिकारी फोंडशिरस यांच्या नियंत्रणात बांणलिंग विद्यालय फोंडशिरस येथे संपन्न होणार आहे.

याकरिता तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेऊन आपणास आवश्यक असलेले विषय प्रकारचे दाखले प्राप्त करून घ्यावेत असे तहसील कार्यालय माळशिरस यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button