छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला राजीव गांधी प्रशासकीय गतिमान प्रगती अभियानाचा प्रथम पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर (बारामती झटका)
राजीव गांधी प्रशासकीय गतिमान प्रगती अभियान व स्पर्धा सन २०२४-२५ यामध्ये विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांना प्राप्त झालेला आहे. आज दि. १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणानंतर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री श्री. संजय शिरसाठ यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमान प्रगती अभियान व स्पर्धा सन २०२४-२५ या अंतर्गत विभागस्तरीय “कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब” या प्रकारात आधुनिक संकल्पना या कामगिरी करिता प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार दिलीप स्वामी (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलताना म्हणाले कि, सन 2024-25 मध्ये आम्ही केलेल्या नाविन्यपूर्ण कामाबद्दल तसेच राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माझे सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.