ताज्या बातम्यासामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव वेळापूर येथील पालखी चौक उड्डाणपुलास नामकरण करण्यात आले…

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर, ता. माळशिरस येथील माळशिरस-पंढरपूर व अकलूज-सांगोला रोडवरील पालखी चौक या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल पालखी चौक वेळापूर असे नामकरण शिवप्रेमींनी केलेले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गाचे विस्तारीकरण झालेले आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपूल निर्माण झालेली आहेत. उड्डाणपुलांना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी, छत्रपती संभाजी महाराज अशी थोर महापुरुषांची नावे देण्यात आलेली आहेत. त्याच धर्तीवर वेळापूर येथील पालखी चौकातील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवप्रेमींनी दिलेले आहे.

सदरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पालखी चौकातील उड्डाणपुलास नामकरण करण्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांची वेळापूर पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी भेट घेऊन उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नामकरण करणार असल्याची पूर्वकल्पना दिलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button