चि. अभिजीत विरकर (ASO Mantralaya), विरकरवाडी आणि चि. सौ. कां. ऋतुजा कटरे (B.Pharm, MBA), कटरेवाडी यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

विरकर परिवार, विरकरवाडी आणि कटरे परिवार, कटरेवाडी यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जुळणार
विरकरवाडी (बारामती झटका)
कै. कृष्णा मारुती विरकर यांचे नातू व कै. नरेंद्र कृष्णा विरकर रा. विरकरवाडी, ता. माण, जि. सातारा यांचे सुपुत्र चि. अभिजीत (ASO Mantralaya) आणि कै. अण्णा लक्ष्मण कटरे यांची नात व श्री. नामदेव अण्णा कटरे रा. कटरेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, यांची सुकन्या चि. सौ. कां. ऋतुजा (B.Pharm, MBA) यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ३० जून २०२४ रोजी दुपारी १२ वा. ४२ मि. या शुभ मुहूर्तावर हरी ओम मंगल कार्यालय, म्हसवड-विरकरवाडी रोड, म्हसवड, ता. माण, जि. सातारा, येथे संपन्न होणार आहे.

तरी या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहुल वधूवरांना अक्षतारूपी शुभाशीर्वाद देण्याचे आवाहन वीरकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन विरकर परिवार व कटरे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.