निमगाव येथील डॉ. राजेंद्र मगर लिखित ‘गंगारामभाऊ मस्के’ हे पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

निमगाव (बारामती झटका)
निमगावचे सुपुञ डॉ. राजेंद्र मगर लिखित महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले गंगाराम भाऊ मस्के चारित्र्य ग्रंथ संपदा संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले.
डॉ. मगर यांनी गंगाराम भाऊ मस्के यांनी समाजासाठी केलेले योगदान समाजापुढे आणले. या चरिञास गत वर्षी महाराष्ट्र शासनाने एक लाख रूपये किंमतीचा न. चिं. केळकर पुरस्कार देऊन तत्कालीन मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात आले.
डॉ. राजेंद्र मगर लिखित गंगाराम भाऊ मस्के हे चारित्र्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्याबद्दल मगर यांचा सन्मान जेष्ठ साहित्यिक बाबा भांड, ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील, प्राचार्य शिरीष लांडगे पाटील, प्राचार्य महादेव वाळुंजकर विद्यापीठाचे मराठी आभ्यासक डॉ. सर्जेराव जिगे व निमगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



