चि. अमित घुले, वटपळी आणि चि. सौ. कां. ऐश्वर्या शेंडगे, सरडे यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न
निमंत्रक श्री. महादेव शंकर घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा
वटपळी (बारामती झटका)
सौ. मनीषा व श्री. महादेव शंकर घुले रा. वटपळी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. अमित आणि सौ. सुनीता व श्री. तुकाराम भगवान शेंडगे, रा. सरडे, ता. फलटण यांची सुकन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा शाही शुभ विवाह सोहळा रविवार दि. १६/६/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटे या गोरज शुभ मुहूर्तावर सजाई गार्डन मंगल कार्यालय फलटण, चिंचुर्णी रोड, विमानतळाशेजारी, फलटण, ता. फलटण येथे संपन्न होणार आहे. तरी या शाही शुभविवाह सोहळ्यानिमित्त वधू-वरांना अक्षतारूपी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक श्री. महादेव शंकर घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी केले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन घुले परिवार व शेंडगे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.