चि. अथर्व वाघमोडे, तिरवंडी व चि. सौ. कां. राणी सुळ पाटील, गोंदी यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार.

प्रेषक – श्री. धनाजी विठ्ठल वाघमोडे पाटील, श्री. डॉ. मनोज कुमार, मधुकर देवकते
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय विठ्ठल संभाजी वाघमोडे पाटील यांचे नातू व श्री. धनाजी विठ्ठल वाघमोडे पाटील रा. तिरवंडी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव अथर्व वाघमोडे पाटील आणि श्री. नारायण दाजी सुळ पाटील यांची नात व श्री. बापू नारायण सुळ पाटील रा. गोंदी, ता. इंदापूर यांची तृतीय कन्या चि. सौ. कां. राणी सुळ पाटील यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 12/06/2024 रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस-अकलूज रोड, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक श्री. धनाजी विठ्ठल वाघमोडे पाटील, श्री. डॉ. मनोजकुमार मधुकर देवकते आणि समस्त वाघमोडे पाटील तिरवंडी यांच्यावतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.

अग्नि नारायणाच्या साक्षीने, रेशमाच्या बंधनात, वाद्याच्या गजरात, सनईच्या मधुर सुरात संपन्न होत आहे. सहजीवन साथी होत आहेत, अशा पवित्र मंगलक्षणी शुभ आशीर्वादाची उधळण करण्याकरता सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आपले स्नेहांकित सौ. हिराबाई व श्री. पंढरीनाथ संभाजी वाघमोडे पाटील, सौ. माधुरी व श्री. धनाजी विठ्ठल वाघमोडे पाटील आणि समस्त वाघमोडे पाटील परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.