करमाळा येथे नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
१९ एप्रिलला आरोग्य शिबिरात मोफत औषधी वाटप व गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्याची लस उपलब्ध होणार
करमाळा (बारामती झटका)
ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व करमाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने बुधवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत अमरनाथ टॉवर, देवीचा माळ रोड, करमाळा येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये नेत्ररोग, हृदय रोग, कर्करोग, बालरोग, किडनी रोग, इ. सर्व प्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये याविषयी अकलूज येथील प्रसिद्ध डॉक्टर सौ. श्रद्धा जवंजाळ मॅडम तपासणी करून लसीकरणाची नोंदणी करणार आहेत.
यावेळी सकाळी १० वा. ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांचा सत्कार सभा मंडपात करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७ वा. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज माने नरसिंहवाडी, हेरवाडकर यांचे कीर्तन होणार आहे. या दोन्ही उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करमाळा तालुका पत्रकार संघाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng