चि. दयानंद वाघमोडे तालुका कृषी अधिकारी, रा. तिरवंडी आणि चि. सौ. कां. ऋतुजा घुले, रा. वटपळी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक – श्री. उत्तमराव शिवदास जानकर संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस, श्री. बाबासाहेब पाराजी वाघमोडे, श्री. बापूराव सोपान वाघमोडे मु. पो. तिरवंडी ता. माळशिरस.
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय पाराजी विठोबा वाघमोडे यांचे नातू व श्री. साहेबराव पाराजी वाघमोडे रा. तिरवंडी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चिरंजीव दयानंद वाघमोडे तालुका कृषी अधिकारी आणि श्री. सोपान (काका) शंकरराव घुले, रा. वटपळी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. ऋतुजा घुले यांचा शाही शुभ विवाह सोहळा रविवार दि. ३१/१२/२०२३ रोजी दुपारी २ वाजून १६ मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, अकलूज-माळशिरस रोड, ६१ फाटा, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद द्यावेत, असे प्रेषक श्री. उत्तमराव शिवदास जानकर संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस श्री. बाबासाहेब पाराजी वाघमोडे, श्री. बापूराव सोपान वाघमोडे मु. पो. तिरवंडी, ता. माळशिरस यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.

लग्न म्हणजे आयुष्याला परिपूर्णता देणारा मंगल सोहळा, दारी आंब्याचे तोरण आणि हृदयात उमलून येणाऱ्या भावना, सप्तपदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, सर्वांची एकच नजर शुभमंगल सावधान आणि सोबत हवेत आपणा सर्वांचे आशीर्वाद, यासाठी आपणांस निमंत्रण दिलेले आहे. लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण अथवा निमंत्रण नजरचुकीने राहिले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आपले नम्र सौ. मंगल व श्री. बाबासाहेब पाराजी वाघमोडे, सौ. सुनीता व श्री. साहेबराव पाराजी वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार तिरवंडी यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.