चि. दयासागर कचरे, कचरेवाडी आणि चि. सौ. कां. सायली शेंडगे, कचरेवाडी यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक
मा. आ. श्री. रामहरी गोविंद रुपनवर.
श्री. गुणवंत माधवराव पाटील
माजी सरपंच, बोरी
श्री. संदिपान साहेबराव मारकड सर
श्री. मारुती गलांडे दादा दहिवडी
श्री. सोमनाथ भगवान कचरे.
चेअरमन, श्री विठ्ठल दूध डेअरी
कचरेवाडी (बारामती झटका)
स्व. भगवान माणिकराव कचरे यांचे नातू व श्री. मच्छिंद्र भगवान कचरे, रा. कचरेवाडी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. दयासागर आणि स्व. माणिक गणपत शेंडगे यांची नात व स्व. शंकर माणिक शेंडगे रा. कचरेवाडी, ता. माळशिरस यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. सायली यांचा शनिवार दि. 24/05/ 2025 रोजी दुपारी 01 वाजून 15 मिनिटे या शुभमुहूर्तावर शाही शुभविवाह सोहळा आनंदी गणेश सांस्कृतिक भवन, आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे, असे प्रेषक विधान परिषदेचे माजी आमदार श्री. रामहरी गोविंद रुपनवर, बोरी गावचे माजी सरपंच श्री. गुणवंत माधवराव पाटील, श्री. संदिपान साहेबराव मारकड (सर), श्री. मारुती गलांडे (दादा) दहिवडी, श्री विठ्ठल दुध डेअरीचे चेअरमन श्री. सोमनाथ भगवान कचरे आणि समस्त कचरे परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
सात जन्माची साथ मिळो, संसाराचा गंध दरवळो, प्रेमाने नांदो हसत-खेळत, सुखद जीवन फुलत राहो, पवित्र बंधन साक्षीला आहे. श्री गणेशाची कृपा आहे. दयासागर आणि सायली बंधन प्रेमाचे अटळ आहे, आशीर्वादाने न्हालो, आम्ही स्नेहाची चाहूल लागो, मंगलमय सोहळ्याला या सौख्य आमच्या नांदो. असे आपले स्नेहांकित सौ. सुनंदा व श्री. दत्तात्रय भगवान कचरे, सौ. सुशीला व श्री. जालिंदर भगवान कचरे, सौ. संगीता व श्री. मच्छिंद्र भगवान कचरे, सौ. सुनीता व श्री. सोमनाथ भगवान कचरे आणि समस्त कचरे परिवार, कचरेवाडी यांच्यावतीने शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त कचरे परिवार कचरेवाडी यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.