लिंगभेद अमान्य मेल (पुरुष) नर्सेस बचाव समितीच्या राज्यभर संतप्त प्रतिक्रिया; मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची शिष्टमंडळाने निवासस्थानी भेट घेतली..
माळशिरस (बारामती झटका)
राज्य शासनाच्या अंतर्गत DMER सरळ सेवा भरतीतील अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम 2025 मधील 80:20 लिंग भेद आधारित अन्यायकारक नियम रद्द करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व नर्सिंग संघटनांना, नर्सिंग संस्थांना, नर्सिंग NGO व संबंधित सर्व नर्सिंग विद्यार्थी/शिक्षक संघटनांना एकत्रित करून स्थापन केलेल्या मेल (पुरुष) नर्सेस बचाव समिती, महाराष्ट्र राज्य (Male Nurses Protection Committee – MNPC) च्या वतीने आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, दि. 11 जून 2025 रोजी DMER द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम 2025 मध्ये 80:20 लिंग विभाजन नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम पुरुष परिचारकांवर स्पष्ट अन्याय करतो व नर्सिंग व्यवसायात लिंग भेदभाव निर्माण करतो.

या नियमामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून नर्सिंग व्यवसायात स्त्रिया:पुरुष यांचे 80:20 प्रमाण बंधनकारक केल्यामुळे, पात्र पुरुष उमेदवारांची संख्यात्मक संधी कमी होणार असून हा नियम भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14, 15(1) आणि 16 (1) च्या विरोधात आहे. जे समानता, भेदभावास मनाई व संधींची समानता याची हमी देतात, त्यामुळे हजारो पात्र पुरुष नर्सिंग उमेदवारांना सरकारी सेवेतून बाहेर फेकले जाणार आहे.
या मागण्यासंदर्भात काल दिवसभर महाराष्ट्रात विविध ठिकाणी नर्सिंग विद्यार्थ्यांना व नर्सिंग स्टाफ यांना मार्गदर्शनपर मेळावे, बैठका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पणनमंत्री जयकुमार रावल खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार निलेश लंके, खासदार अशोक चव्हाण आमदार संजय बांगर, खासदार, आमदार लोकप्रतिनिधींना निवेदने, प्रशासनाला निवेदने देऊन 80:20 लिंगविभाजक नियम तत्काळ रद्द करण्यात यावा, नर्सिंग भरती ही केवळ शैक्षणिक गुणवत्ता व पात्रता आधारित, लिंगनिरपेक्ष व संविधानबद्ध पद्धतीने पार पाडावी. पुरुष नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांना सन्माननीय प्रतिनिधित्वाची हमी देण्यात यावी, संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी, आमच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा अश्या अनेक संदर्भात विविध मागण्या केल्या काही ठिकाणी संतप्त होत राज्य शासनाविरोधात तीव्र नापसंती व्यक्त करत करण्यात आली व हा लिंगभेद करणारा नियम रद्द नाही झाला तर लवकरच मोठ्या संख्येने विधानभवनावर आंदोलन करण्याचा गंभीर इशारा मेल (पुरुष) नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळेस एनजीओ चे सर्वेसर्वा डॉक्टर राहुल जवंजाळ, डॉ. श्रद्धा जंजाळ, सौ. सोनिया गोरे, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, शंकरनाना देशमुख आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



