चि. गणेश कर्णवर पाटील, गोरडवाडी आणि चि. सौ. कां. वैष्णवी हाके पाटील, महाळुंग यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न
प्रेषक – श्री. एन. शेषागिरी राव चेअरमन, सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी, श्री. बाळासाहेब कर्णवर पाटील व्हाईस चेअरमन सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी, श्री. महेश काळे मॅनेजिंग डायरेक्टर साई प्रो. बायो प्रा लि. कडलास, श्री. ए. इंद्रसेना रेड्डी मॅनेजिंग डायरेक्टर व्ही. आय. एस. केमिकल्स प्रा. लि. कंपनी, श्री. राजकुमार कोळेकर मॅनेजिंग डायरेक्टर साई सेव्हन व्हेनच्युर प्रा. लि., श्री. सोमनाथ कर्णवर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन
गोरडवाडी (बारामती झटका)
कै. नानासो आबाजी कर्णवर पाटील यांचे नातू व श्री. बाळासाहेब नानासो कर्णवर पाटील रा. गोरडवाडी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. गणेश आणि श्री. बिरा महादू हाके पाटील यांची नात व श्री. विलास बिरा हाके पाटील रा. महाळुंग, ता. माळशिरस यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. वैष्णवी यांचा शाही शुभ विवाह सोहळा रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वा. ४५ मिनिटे या गोरज मुहूर्तावर कर्णवर पाटील वस्ती, माळशिरस-म्हसवड रोड, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शाही शुभविवाह सोहळ्यास आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार यांनी आवर्जून उपस्थित राहून वधू-वरास आशीर्वाद देण्याचे नम्र आवाहन प्रेषक श्री. एन. शेषागिरी राव चेअरमन, सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी, श्री. बाळासाहेब कर्णवर पाटील व्हाईस चेअरमन सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी, श्री. महेश काळे मॅनेजिंग डायरेक्टर साई प्रो. बायो प्रा लि. कडलास, श्री. ए. इंद्रसेना रेड्डी मॅनेजिंग डायरेक्टर व्ही. आय. एस. केमिकल्स प्रा. लि. कंपनी, श्री. राजकुमार कोळेकर मॅनेजिंग डायरेक्टर साई सेव्हन व्हेनच्युर प्रा. लि., श्री. सोमनाथ कर्णवर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे अशी विनंती कर्णवर पाटील परिवार व हाके पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.