ताज्या बातम्या

चि. गोपाळ गोडगे व चि. सौ. कां. श्रावणी मोरे यांचा शाही शुभविवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला.

माढा (बारामती झटका)

अंबड ता. माढा, जि. सोलापूर येथे दि. 7/12/2024 रोजी दुपारी चि. गोपाळ (मॅकॅनिकल इंजिनियर, बार्शी ता. बार्शी) व चि. सौ. कां. श्रावणी (मॅकॅनिकल इंजिनियर गुरसाळे, ता. माळशिरस) यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

या वेळी माळशिरस विधानसभा मतदार संघाचे युवा नेते व माळशिरस पंचायत समिती माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ, माढा तालुका पंचायत समिती सभापती विक्रमदादा शिंदे, कुर्डूवाडी नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष संजय दादा टोणपे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य उद्योजक दत्तात्रय शेळके, गुणवरे गावचे मा. सरपंच पै. शहाजी नाना गावडे पाटील, माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. कल्पनाताई जगदाळे, कुर्डूवाडीच्या माजी नगरसेविका सौ. स्वातीताई पवार, पै. बापूसाहेब गायकवाड, नंदकुमार टोणपे, पांडे ग्रामपंचायतीचे सरपंच तुकाराम क्षीरसागर, लक्ष्मण पवार, सौरभ परबत व इतर मान्यवर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.

यावेळी माढा लोकसभा मतदार संघातील करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, फलटण, माण, खटाव तालुक्यातील व बार्शी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी, उद्योजक, संरक्षण क्षेत्र, पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवर, पाहुणे मंडळी, महिला, माताभगिनी यांनी वधूवर यांना विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या लग्न समारंभात कोल्हापुरी पद्धतीचे फेटे बांधण्याचे काम ईश्वर गाडेकर, कुर्डूवाडी यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे, बादलेवाडी, ता. माढा, यांचा सन्मान मोरे व गोडगे परिवाराच्या वतीने धनराज मोरे, गुरसाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गौरव मोरे, राजेंद्र गोडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. हा शाही शुभ विवाह सोहळा अतिशय थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button