ताज्या बातम्या

चि. निखिल क्षीरसागर पाटील, निरा-नरसिंहपुर व चि. सौ. कां. रोहिणी पवार, गारअकोले यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.

प्रेषक – श्री. मगनदास श्रीपती क्षीरसागर पाटील खजिनदार शिक्षण प्रसारक मंडळ, विकास व उत्कर्ष मंडळ, श्री. अरुण हरिदास क्षीरसागर पाटील उपाध्यक्ष इंदापूर तालुका ग्रंथालय संघ
माजी अध्यक्ष तंटामुक्ती समिती गिरवी, अध्यक्ष शंभुराजे सेवाभावी संस्था

बावडा (बारामती झटका)

स्वर्गीय श्रीपती बलभीम क्षीरसागर पाटील यांचे नातू व श्री‌. मगनदास श्रीपती क्षीरसागर पाटील रा. निरा नरसिंहपुर (गिरवी), ता. इंदापूर, यांचे चिरंजीव निखिल क्षीरसागर पाटील आणि श्री. हैबतराव केशव पवार यांची नात व श्री. तुकाराम हैबतराव पवार रा. गारअकोले, ता. माढा यांची तृतीय सुकन्या चि. सौ. कां. रोहिणी पवार यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दिनांक 31/12/2023 रोजी दुपारी 12 वाजून 41 मिनिटे या शुभ मुहूर्तावर गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवे पाटी, अकलूज -टेंभुर्णी रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत असे प्रेषक श्री. मगनदास श्रीपती क्षीरसागर पाटील खजिनदार शिक्षण प्रसारक मंडळ विकास व उत्कर्ष मंडळ, श्री. अरुण हरिदास क्षीरसागर पाटील उपाध्यक्ष इंदापूर तालुका ग्रंथालय संघ, माजी अध्यक्ष तंटामुक्ती समिती गिरवी, संस्थापक अध्यक्ष शंभुराजे सेवाभावी संस्था यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

हा पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जीवनाची, मुहूर्त क्षणाचा पण नाती आयुष्याची, आपला सहभाग क्षणाचा पण, आशीर्वाद कायमचा, अक्षतांचा सुखद वर्षाव आणि मंगळसूत्रांच्या पवित्र्याने संपन्न होणारा हा विवाह सोहळा तुमच्या उपस्थितीने अविस्मरणीय व्हावा म्हणून हे प्रेमपूर्वक आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण मिळाले नसल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त क्षीरसागर पाटील यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button