चि. निवेदक संदीप जाधव, नातेपुते व चि. सौ. कां. पूजा मकवाने, शिवरी, ता. पुरंदर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….
आशीर्वाद
समाजरत्न स्व. राजेंद्रभाऊ पाटील
माजी पोलीस पाटील, नातेपुते
प्रेषक
श्री. बाळासाहेब लक्ष्मण जाधव
मु. पो. नातेपुते, ता. माळशिरस
नातेपुते (बारामती झटका)
स्वर्गीय लक्ष्मण श्रीपती जाधव यांचे नातू व श्री. बाळासो लक्ष्मण जाधव रा. नातेपुते, यांचे ज्येष्ठ चिरंजीव निवेदक संदीप आणि श्री. बाबूलाल हरसिंग मकवाने यांची नात व श्री. अरुण बाबूलाल मकवाने रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांची ज्येष्ठ सुकन्या चि. सौ. कां. पूजा यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. 23/12/2024 रोजी दुपारी 01 वाजून 16 मिनिटे या शुभ मुहूर्तावर श्री दत्त गार्डन मंगल कार्यालय, काळज-फलटण-लोणंद रोड, ता. फलटण, जि. सातारा येथे नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील समाजरत्न स्वर्गीय राजेंद्रभाऊ पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. बाळासाहेब लक्ष्मण जाधव यांनी आवाहन केलेले आहे.
मेघांनी आनंद कण वर्षावे, इंद्रधनुनी सप्तरंगी द्यावे, वसुंधरेने धैर्य द्यावे, आभाळाने छत्र धरावे आणि वधू-वरांचे अवघे जीवन सुखी व्हावे, असे आशीर्वाद कायमचे द्यावे, यासाठी आग्रहाचे निमंत्रण… आपले स्नेहांकित सौ. कमल व श्री. बाळासो लक्ष्मण जाधव तसेच निमंत्रक चि. सचिन बाळासो जाधव, चि. नितीन बाळासो जाधव व समस्त जाधव परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण हस्ते परहस्ते न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे कार्यक्रमातून सर्व परिचित असणारे निवेदक तथा नवरदेव चि. संदीप बाळासाहेब जाधव यांनी मित्रपरिवार, नातेवाईक व आप्तेष्ट यांना आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.