Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक

महासंघ जिल्हा संघटनेकडून प्रलंबित पेंडिंग कमीशनचे कामे पुर्ण

अखिल राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ सोलापूर ग्रामीण जिल्हा संघटनेकडुन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्याकडे मागील पेंडिंग कमीशन एक ते दीड वर्षांपासूनचे व चालू नोव्हेंबर 2024 ते मे 2025 या महिन्यामध्ये कमीशन न मिळालेले धान्य दुकानदार यांचे कमीशन मिळावे. याबाबत महासंघ जिल्हा संघटनेकडुन निवेदन देण्यात आले.

यावेळी चर्चा दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी मागील एक ते दीड वर्षाखालील पेंडिंग कमिशन हे रेगुलर कमिशन जमा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हे कमीशन जमा करण्यात येईल, चालू पेंडिंग कमीशन मधील नोव्हेंबर 2024 ते मे 2025 हे कमीशन सर्वान बरोबर जमा करण्यात येईल असे सांगितले,

तसेच महासंघ जिल्हा संघटनेकडुन यावेळी बसुन सर्व ग्रामीण जिल्ह्यामधील पेंडिंग धान्य दुकानदार यांचे रजिस्ट्रेशन करून कामे पुर्ण घेतली. तसेच महासंघ जिल्हा संघटनेकडुन जिल्हा पुरवठा अधिकारी व अव्वल कारकून मोईन डोणगावकर यांनी उशीर पर्यंत थांबून फक्त धान्य दुकानदार यांचा कामासाठी वेळ दिला, याबद्दल महासंघ जिल्हा कडून आभार मानण्यात आले.

यावेळी महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक, महासंघ जिल्हा संघटनेचे सहसचिव सोमनाथ पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री. किरण दानोळे, तालुकाध्यक्ष श्री. गणेश बागल, पंढरपूर तालुक उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव साहेब, उपाध्यक्ष महावीर वाकसे, मिलिंद रेडेकर तसेच ज्येष्ठ दुकानदार बंधू विठ्ठल महामुरे, नजीर भाई मुलाणी, जे. एच नलवडे, शिरगिरे सर, किरण टकले, अरूण जाधव, अक्षय मुंडफणे व जिल्हा मधील महासंघ संघटनेचे 45 ते 50 धान्य दुकानदार उपस्थित होते,

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom