चि. प्रसाद रुपनवर पाटील, कुरबावी व चि. सौ. कां. प्रणिता नरुटे, काझड यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….
प्रेषक – श्री. दुर्योधन बाबुराव रुपनवर पाटील शाखाधिकारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा एकशिव, श्री. गजानन रामकृष्ण रुपनवर पाटील
कुरबावी (बारामती झटका)
श्री. वामन भगवान रुपनवर पाटील यांचे नातू व सौ. रत्नप्रभा व श्री. शिवराम वामन रुपनवर पाटील, रा. कुरबावी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. प्रसाद रुपनवर पाटील आणि श्री. लालासो महादेव नरूटे यांची नात व सौ. उषा व श्री. अतुल लालासो नरुटे, रा. काझड, ता. इंदापूर यांची सुकन्या चि. सौ. कां. प्रणिता नरुटे यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 28/07/2024 रोजी दुपारी 01 वाजून 35 मिनिटे या शुभ मुहूर्तावर श्री चैतन्य लॉन्स शिंदेवाडी, ता, माळशिरस, शिंदेवाडी-धर्मपुरी रोडवर, संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा एकशिव शाखा अधिकारी श्री. दुर्योधन बाबुराव रुपनवर पाटील व श्री. गजानन रामकृष्ण रुपनवर पाटील यांच्या वतीने लग्नकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
पाऊस क्षणाचा पण, गारवा कायमचा, भेट क्षणाची पण, मैत्री दोन जीवांची, मूहुर्त क्षणाचा पण, नाती आयुष्याची, आपला सहभाग क्षणाचा पण, आशीर्वाद कायमचा… या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार आगत्य येऊन वधूवरांस शुभ आशीर्वाद द्यावेत, असे आपले विनीत सौ. सोनाबाई व श्री. वामन भगवान रुपनवर पाटील, सौ. बायडाबाई व श्री. रामकृष्ण भगवान रूपनवर पाटील आणि समस्त रुपनवर पाटील यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात आलेले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे, श्री. दुर्योधन बाबुराव रुपनवर पाटील व श्री. गजानन रामकृष्ण रुपनवर पाटील आणि समस्त रुपनवर पाटील कुरबावी यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Thank you I have just been searching for information approximately this topic for a while and yours is the best I have found out so far However what in regards to the bottom line Are you certain concerning the supply