चि. रणजीत पाटील, भांब व चि. सौ. कां. मुक्ताई तांबवे, लोणंद (नातेपुते) यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. शिवाजी पाटील, भांब व श्री. विजय तांबवे, लोणंद (नातेपुते) यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार….
भांब (बारामती झटका)
श्री. मारुती संभाजी पाटील यांचे नातू व सौ. विजया व श्री. शिवाजी मारुती पाटील रा. भांब, ता. माळशिरस, यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. रणजीत व श्री. जगन्नाथ अप्पासो तांबवे यांची नात व सौ. नंदिनी व श्री. विजय जगन्नाथ तांबवे रा. लोणंद (नातेपुते), ता. माळशिरस यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. मुक्ताई यांचा शाही शुभ विवाह सोहळा गुरुवार दि. १४/८/२०२५ रोजी दुपारी १ वा. ३३ मिनिटे या शुभ मुहूर्तावर राज आनंद मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते येथे संपन्न होणार आहे.
मंगल शुभ मुहूर्तावर आप्तेष्ट, स्वकीय, पै-पाहुणे, मित्रपरिवार यांनी वधू-वरांना अक्षतारूपी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पाटील व तांबवे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



