चि. रोहित निंबाळकर, येळीव आणि चि. सौ. कां. पल्लवी माने देशमुख, बोंडले यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. गुलाब निंबाळकर, येळीव आणि श्री. दत्तात्रय माने देशमुख, बोंडले यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
माळशिरस (बारामती झटक)
कै. बळी दाजी निंबाळकर यांचे नातू व श्री. गुलाब बळी निंबाळकर रा. येळीव, ता. माळशिरस, यांचे सुपुत्र चि. रोहित आणि श्री. शंकर धोंडीबा माने देशमुख यांची नात व श्री. दत्तात्रय शंकर माने देशमुख रा. बोंडले, ता. माळशिरस, यांची सुकन्या चि. सौ. कां. पल्लवी यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. २५/२/२०२५ रोजी दुपारी १२ वा. १९ मि. या शुभ मुहूर्तावर गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवेपाटी २५/४ लवंग, अकलूज-टेंभुर्णी रोड ता. माळशिरस, जि. सोलापूर, येथे संपन्न होणार आहे.
लग्न एक स्नेहबंध, रेशमी नातं जन्मजन्मांतरीच, असाच एक ऋणानुबंध सनई चौघड्याच्या सप्तसुरात, अग्निदेवता व कुलदेवतेला साक्षी ठेवून संपन्न होत आहे. आपल्या सानिध्यात हा आनंद सोहळा साजरा व्हावा व सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांना अक्षतारूपी शुभाशीर्वाद द्यावेत, असे नम्र आवाहन निंबाळकर व माने देशमुख परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाई गडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन समस्त निंबाळकर आणि माने देशमुख परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.