चि. समाधान धायगुडे, कुसमोड आणि चि. सौ. कां. सानिका दुधाळ, अकलूज यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार….
प्रेषक – श्री, बाळासाहेब राजाराम धायगुडे, मु. पो. कुसमोड, ता. माळशिरस.
पिलीव (बारामती झटका)
श्री. बाळासो राजाराम धायगुडे रा. कुसमोड, ता. माळशिरस यांचे कनिष्ठ सुपुत्र चि. समाधान आणि श्री. दीपक भगवान दुधाळ रा. अकलूज, ता. माळशिरस यांची ज्येष्ठ सुकन्या चि. सौ. कां. सानिका यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 16/06/2024 रोजी 12 वाजून 57 मिनिटे या शुभमुहूर्तावर शिवतीर्थ मंगल कार्यालय, साळमुख, पिलीव-साळमुख रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक श्री. बाळासाहेब धायगुडे, माजी सरपंच महावीर धायगुडे, माजी सरपंच श्री. महादेव कपने, माजी सरपंच श्री. तुषार लवटे, श्री. संजय मदने (सर), श्री. रणजीत पाटील, श्री. विश्वास तांबवे आणि समस्त धायगुडे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
जीवनातील अविस्मरणीय प्रसंग, सनईच्या मंजुळ स्वरात, हा अमृत मुहूर्त अशा या मंगल प्रसंगी मायेच्या ममतेने ओथंबलेले, जिव्हाळ्याच्या भावनेने भिजलेले असे आशीर्वाद वधूवरांना देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार यावे, असे आपले स्नेहांकित सौ. द्रौपदी व श्री. सिताराम राजाराम धायगुडे, सौ. सखुबाई व श्री. बाळासो राजाराम धायगुडे आणि समस्त धायगुडे परिवार कुसमोड यांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण आहे.
लग्नाच्या काही गडबडीत नजरचुकीने आपणास आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण आहे, असे समजून शुभकार्यास उपस्थित राहावे, असे श्री. बाळासो राजाराम धायगुडे यांच्यावतीने विनंती आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.