चि. संकेत क्षीरसागर, डोईठाण आणि चि. सौ. कां. रेणुका वाघमारे, धोंडराई यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते आणि ऊर्जा फाउंडेशनच्या संचालिका सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाह सोहळा होणार संपन्न
डोईठाण (बारामती झटका)
कै. रावसाहेब सोनाजी क्षीरसागर यांचे नातू व सौ. अनिता व श्री. बापूराव रावसाहेब क्षीरसागर (उपाध्यक्ष, आष्टी तालुका गुरव समाज संघ) रा. डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, यांचे ज्येष्ठ सुपूत्र चि. संकेत आणि श्री. देविदास बाबुराव वाघमारे यांची नात व सौ. गंगुबाई व श्री. अशोक देविदास वाघमारे रा. धोंडराई, ता. गेवराई, जि. बीड, यांची कन्या चि. सौ. कां. रेणुका यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.३० वा. माऊली मंगल कार्यालय, शेवगांव-गेवराई रोड, माऊलीफाटा, बोरीपिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड, येथे संपन्न होणार आहे. या शाही शुभ विवाह सोहळा भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते व ऊर्जा फाउंडेशनच्या संचालिका सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तसेच या विवाह सोहळ्यास ह. भ. प. महंत काशिनाथ महाराज (नागनाथ देवस्थान, गणेशगड नागतळा) आणि ह. भ. प. बबन महाराज बहिरवाळ (मदन महाराज संस्थान, कडा) यांचे शुभाशीर्वाद असणार आहेत.

तरी या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. अनिता व श्री. बापूराव रावसाहेब क्षिरसागर (उपाध्यक्ष, आष्टी तालुका गुरव समाज संघ) आणि चि. महेश बापुराव क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त क्षीरसागर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.