चि. सौ. कां. अंकिता बरकडे, शेंडेचिंच मळोली व चि. अक्षय पालवे पाटील, मांडवे यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. सचिन शामराव बरकडे
असिस्टंट मॅनेजर एसबीआय मुंबई
चि. अनिकेत हनुमंत बरकडे
मळोली (बारामती झटका)
श्री. सोनबा कोंडीबा बरकडे यांची नात व श्री. हनुमंत सोनबा बरकडे रा. शेंडेचिंच मळोली. ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. अंकिता व श्री. पांडुरंग बाबा पालवे पाटील यांचे नातू व श्री. दादा बाबा पालवे पाटील रा. मांडवे, ता. माळशिरस यांचे चि. अक्षय यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 30/04/2025 रोजी दुपारी 02 वाजून 46 मिनिटे या शुभमुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय सदाशिवनगर नजीक, जाधववाडी रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. सचिन शामराव बरकडे असिस्टंट मॅनेजर एसबीआय बँक मुंबई, चि. अनिकेत हनुमंत बरकडे व समस्त बरकडे परिवार शेंडेचिंच मळोली यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
सोनियाच्या पावलाने, मेहंदीच्या हाताने, हळदीच्या अंगाने, मधुर स्वराने, श्री सद्गुरु, कुलदैवतांच्या साक्षीने मातापित्यांच्या आशीर्वादाने, सप्तपदीच्या पवित्र बंधनाने एकमेकांस आजन्म साथ देणाऱ्या अंकिता-अक्षय या नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आपले स्नेहांकित श्री. सोनबा कोंडीबा बरकडे, सौ. कमल हनुमंत बरकडे व श्री. हनुमंत सोनबा बरकडे व समस्त बरकडे परिवार शेंडेचिंच मळोली यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत नजरचुकीने आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त बरकडे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.