चि. सौ. कां. गौरी कर्णवर पाटील, गोरडवाडी आणि चि. सर्जेराव पडवळकर, औंढी यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

निमंत्रक – सौ. शोभा बाळासाहेब कर्णवर पाटील व श्री. बाळासाहेब पाटील व्हाईस चेअरमन सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी
गोरडवाडी (बारामती झटका)
कै. नानासो आबाजी कर्णवर पाटील यांची नात व श्री. बाळासाहेब नानासो कर्णवर पाटील रा. गोरडवाडी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. गौरी आणि कै. लक्ष्मण तात्या पडवळकर यांचे नातू व श्री. अंकुश लक्ष्मण पडवळकर रा. औंढी, ता. मोहोळ, यांचे सुपुत्र चि. सर्जेराव यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि.३०/६/२०२४ रोजी सायंकाळी ६ वा. १४ मिनिटे या गोरज मुहूर्तावर डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती वैष्णव सदन, ६५ एकर जवळ, भटुंबरे, पंढरपूर, येथे संपन्न होणार आहे.
या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना अक्षतारुपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक सौ. शोभा बाळासाहेब कर्णवर पाटील व श्री. बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा. चेअरमन, सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लिमिटेड, राजेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे



विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनई चौघडांच्या मंजुळ स्वरात नव जीवनात केलेले पदार्पण, यासाठी हवा ज्येष्ठांचा आशीर्वाद. लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन कर्णवर पाटील व पडवळकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.