चि. सौ. कां. प्रतीक्षा फडतरे, मांडवे व चि. विकास निंबाळकर यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
श्री. आकाश रमेश फडतरे
गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, मांडवे यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन
मांडवे (बारामती झटका)
श्री. नागनाथ सदाशिव फडतरे रा. मांडवे, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. प्रतीक्षा व श्री. गुलाब विठ्ठल निंबाळकर, रा. येळीव, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. विकास यांच्या शाही शुभविवाह सोहळ्याचे आयोजन सोमवार दि. ३/११/२०२५ रोजी दुपारी १ वा. १० मि. या शुभमुहूर्तावर मधुर मिलन सांस्कृतिक भवन मांडवेनातेपुते, नातेपुते-पंढरपूर रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. अग्नी नारायणाच्या साक्षीने, प्रतिक्षा आणि विकास हे रेशमाच्या बंधनात, वाद्यांच्या गजरात, सनईच्या सुरात, हळदी आणि मेहंदीच्या रंगात जीवनसाथी होत आहेत. अशा मंगल प्रसंगी आपले शुभार्शीवाद मिळावेत यासाठी प्रेषक श्री. आकाश रमेश फडतरे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, मांडवे यांच्या वतीने सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपले नम्र श्री. सदाशिव ज्योतिराम फडतरे, सौ. सुनंदा व श्री. रमेश सदाशिव फडतरे, सौ. सीमा व श्री. नागनाथ सदाशिव फडतरे यांच्या वतीने शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त फडतरे व निंबाळकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



