चि. सौ. कां. प्रतिक्षा भाकरे चव्हाण पिसेवाडी, वेळापूर व चि. संतोष सरडे कन्हेरगाव यांचा शाही शुभविवाह संपन्न होणार…

प्रेषक
श्री. श्रीराजभैय्या नंदकुमार माने पाटील.
मा. सरपंच संग्रामनगर.
श्री. उमेश लक्ष्मण भाकरे – चव्हाण.
चेअरमन, श्रीकृष्ण ॲग्रो इंडस्ट्रीज.
वेळापूर (बारामती झटका)
श्री. लक्ष्मण नामदेव भाकरे चव्हाण यांची नात व श्री. उमेश लक्ष्मण भाकरे चव्हाण रा. पिसेवाडी, वेळापूर, ता. माळशिरस यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. प्रतिक्षा व स्वर्गीय शाहू बंडू सरडे यांचे नातू व श्री. हरिदास शाहू सरडे रा. कन्हेरगाव, ता. माढा यांचे ज्येष्ठ सुपूत्र चि. संतोष यांचा रविवार दि. 26/10/2025 रोजी दुपारी 03 वाजून 15 मि. या शुभ मुहूर्तावर सुवर्ण लॉन्स मंगल कार्यालय, अकलूज-वेळापूर रोड, सिद्धनाथ पेट्रोल पंप शेजारी, ता. माळशिरस येथे शाही शुभ विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक संग्रामनगर ग्रामपंचायतीचे मा. सरपंच श्री. श्रीराजभैय्या नंदकुमार माने पाटील, श्रीकृष्ण ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री. उमेश लक्ष्मण भाकरे चव्हाण आणि समस्त भाकरे चव्हाण पिसेवाडी, वेळापूर यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

संतांच्या पवित्र पंचक्रोशीत, शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये, महाराष्ट्राच्या पावन भूमीत, मराठमोळ्या वातावरणात, आई जगदंबेच्या शीतलछायेत, कुलदैवत ज्योतिबाच्या आशीर्वादाने या शुभ मंगल प्रसंगी आपण आगत्य येऊन वधूवरांस शुभाशीर्वाद देण्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आपले नम्र सौ.सिंधू व श्री. लक्ष्मण नामदेव भाकरे चव्हाण, सौ. शीतल व श्री. उमेश लक्ष्मण भाकरे चव्हाण, सौ. मनीषा व श्री. रमेश लक्ष्मण भाकरे चव्हाण, सौ. सुप्रिया व श्री. सुनील लक्ष्मण भाकरे चव्हाण व समस्त भाकरे चव्हाण परिवार त्यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे श्री. श्रीराजभैया नंदकुमार माने पाटील व श्री. उमेश लक्ष्मण भाकरे चव्हाण व समस्त भाकरे चव्हाण परिवार यांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



