चि. सौ. कां. शितल ठवरे पाटील, खुडूस व चि. ओंकार अनुसे, कटफळ यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. आनंतराव विठ्ठल ठवरे पाटील, खुडूस व श्री. अर्जुन तातोबा अनुसे, कटफळ यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
खुडूस (बारामती झटका)
कै. रतन व कै. दत्तात्रय रामचंद्र ठवरे पाटील यांची कन्या व सौ. रेश्मा व श्री. आनंतराव विठ्ठल ठवरे पाटील, रा. खुडूस, ता. माळशिरस यांची पुतणी चि. सौ. कां. शितल (Civil Engineer) आणि सौ. हिराबाई व श्री. तातोबा कृष्णा अनुसे यांचे नातू व सौ. उषा व श्री. अर्जुन तातोबा अनुसे रा. कटफळ, ता. सांगोला यांचे ज्येष्ठ सुपुत्र चिरंजीव ओंकार (Electrical Engineer) यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. २८/७/२०२४ रोजी दुपारी १२ वा. ३१ मि. या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, 61 फाटा, माळशिरस-अकलूज रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना अक्षतारुपी शुभ आशीर्वाद देण्याची नम्र विनंती सौ. रेश्मा व श्री. आनंतराव विठ्ठल ठवरे पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याची विनंती ठवरे पाटील परिवार व अनुसे परिवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.