चि. सौ. कां. स्नेहल घोडके, माळशिरस आणि चि. ओंकार शेळके पाटील, रा. निंबोडी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. नारायणराव मारुती घोडके
संचालक, माळशिरस प्रशाला माळशिरस
मा. सदस्य ग्रामपंचायत माळशिरस..
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय मारुती बापू घोडके यांची नात व सौ. सीमादेवी व श्री. संजय मारुती घोडके रा. 61 फाटा, माळशिरस यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. स्नेहल आणि स्वर्गीय आनंदराव देवबा शेळके पाटील यांचे नातू व श्रीमती आशा व स्वर्गीय एकनाथ आनंदराव शेळके पाटील, रा. निंबोडी, ता. खंडाळा यांचे सुपुत्र चि. ओंकार यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 14/05/2025 रोजी दुपारी 12 वा. 38 मि. या शुभ मुहूर्तावर श्री दत्त गार्डन मंगल कार्यालय, लोणंद-फलटण रोड, काळज, ता. फलटण, जि. सातारा, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे श्री. नारायणराव मारुती घोडके संचालक, माळशिरस प्रशाला माळशिरस व माजी सदस्य, माळशिरस ग्रामपंचायत माळशिरस यांनी लग्न समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.
पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवांची, मुहूर्त क्षणाचा पण नाती आयुष्याची, आपला सहवास क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्य येऊन वधूवरास शुभाशीर्वाद द्यावेत, असे आपले नम्र सौ. लक्ष्मी व पुतळाबाई व श्री. उत्तम बाबा घोडके, सौ. स्वाती व श्री. नारायणराव मारुती घोडके, सौ. प्रभावती व श्री. महादेव मारुती घोडके आणि समस्त घोडके परिवार माळशिरस यांच्यावतीने लग्न समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून लग्नकार्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे प्रेषक श्री. नारायणराव मारुती घोडके व समस्त घोडके परिवार माळशिरस आणि श्री समर्थ कार केअर पुणे, गणेश कीर्ती मिल्क पार्लर माळशिरस, गणेश कीर्ती एंटरप्राइजेस माळशिरस सर्व फर्मच्या वतीने ग्राहक, व्यापारी, मित्रपरिवार, हितचिंतक, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.