चि. सौ. कां. वैभवी पांढरे पाटील, नातेपुते व चि. रामदास थिटे, फडतरी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक
आ. उत्तमराव शिवदास जानकर
माळशिरस विधानसभा
श्री. गणपत कृष्णा पांढरे पाटील
संचालक, बळीराजा ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था नातेपुते..
नातेपुते (बारामती झटका)
सौ. कांताबाई व श्री. गणपत कृष्णा पांढरे पाटील यांची नात व सौ. अश्विनी व श्री. संजय गणपत पांढरे पाटील रा. नातेपुते, यांची कन्या चि. सौ. कां. वैभवी आणि स्व. अण्णा श्रीपती थिटे यांचे नातू व सौ. सखुबाई व श्री. तुकाराम अण्णा थिटे रा. फडतरी, यांचे सुपुत्र चि. रामदास यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 13/07/2025 रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटे या शुभ मुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, नातेपुते, नातेपुते-दहिगाव रोड, काळे पेट्रोल पंप समोर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आ. श्री. उत्तमराव शिवदास जानकर, बळीराजा ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था नातेपुतेचे संचालक श्री. गणपत कृष्णा पांढरे पाटील व समस्त पांढरे पाटील यांच्यावतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सप्तपदीच्या प्रदक्षिणा हळदी कुंकवाचं लेणं, नाजूक अक्षदांचा सुखद वर्षाव आणि मणी मंगळसूत्राचं पावित्र्य घेऊन संपन्न होणारा सोहळा म्हणजे दोन जीवांच्या वैवाहिक जीवनाचा शुभारंभ… अशा या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन वधूवरांस शुभाशीर्वाद द्यावेत, असे आपले स्नेहांकित श्री. पोपट कृष्णा पांढरे पाटील, सौ. कांताबाई व श्री. गणपत कृष्णा पांढरे पाटील आणि समस्त पांढरे पाटील, नातेपुते यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदरच्या लग्नाचे स्वागत सुरेश (अण्णासाहेब) पांढरे पाटील मित्र परिवार व पांढरे पाटील परिवार करणार आहेत.

तरी लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण हस्ते परहस्ते न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त पांढरे पाटील परिवार नातेपुते यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



