Uncategorizedताज्या बातम्या

तरुणांनी उद्योगधंद्यात उतरावे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर यांचे आवाहन

तरंगफळ (बारामती झटका)

तरंगफळ व  परिसरातील जास्तीत जास्त युवकांनी उद्योगधंद्यात उतरावे असे मत गोरख जानकर यांनी व्यत केले. ते तरंगफळ येथील युवा श्री. युवराज नरुटे यांना नाशिक येथील Reseal.in या संस्थेकडून मिळालेल्या युवा उद्योजक बिजनेस एक्सलन्स अवॉर्ड ‘ए 1 मिल्क सप्लायर इन सोलापूर’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून गावातील तरुणांनी युवराज नरुटे यांचा आदर्श घेऊन व्यवसायाकडे वळावे असे ते बोलले.
यावेळी युवराज नरुटे यांचा सत्कार विकास सेवा सोसायटीचे सदस्य आण्णासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मा. सरपंच सुजित तरंगे, मा. उपसरपंच शशिकांत साळवे, युवा नेते प्रदीप तरंगे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तरंगे, प्रगतशील बागायतदार कुलदीप जानकर, व्यासायिक राहुल नरुटे, भारत नरुटे, सौ. कविता नरुटे, जयश्री मदने, यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button