चि. विजय पालवे पाटील, मांडवे व चि. सौ. कां. निकिता माने पाटील, कोथळे यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार..
प्रेषक – श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे पाटील सदस्य, ग्रामपंचायत मांडवे, श्री. महादेव भगवान पालवे पाटील अध्यक्ष, तंटामुक्ती समिती मांडवे
मांडवे (बारामती झटका)
स्वर्गीय दादा बाबा पालवे पाटील यांचे नातू व श्री. ज्ञानेश्वर दादा पालवे पाटील, रा. मांडवे, ता. माळशिरस, यांचे द्वितीय सुपुत्र चि. विजय आणि श्री. रामचंद्र केरू माने पाटील यांची नात व श्री. लालासाहेब रामचंद्र माने पाटील, रा. कोथळे, ता. माळशिरस, यांची सुकन्या चि. सौ. कां. निकिता यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 21/07/2024 रोजी दुपारी 12 वाजून 31 मिनिटे या शुभमुहूर्तावर मधुर मिलन मंगल कार्यालय मांडवे, नातेपुते नजीक, पंढरपूर रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक मांडवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे पाटील व महात्मा गांधी तंटामुक्ती समिती मांडवे चे अध्यक्ष श्री. महादेव भगवान पालवे पाटील व समस्त पालवे पाटील यांच्या वतीने लग्न कार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अग्नी नारायणाच्या साक्षीने, रेशमांच्या बंधनात, वाद्यांच्या गजरात, सनईच्या मधुर सुरात, विवाह संपन्न होत आहे. अशा पवित्र मंगल क्षणी शुभ आशीर्वादाची उधळण करावी, यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आपले स्नेहांकित सौ. संगीता व श्री. ज्ञानेश्वर दादा पालवे पाटील, माजी सरपंच मंडळ सौ. मंगल व श्री. दत्तात्रय दादा पालवे पाटील यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.
लग्न समारंभात स्वागतोत्सुक माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. तानाजी जगन्नाथ पालवे पाटील, माजी सरपंच श्री. कुमार बबन पाटील, माजी सरपंच श्री. हनुमंत भीमराव टेळे, विद्यमान सरपंच श्री. अर्जुन बबन दुधाळ, ग्रामपंचायत सदस्य श्री. रितेश बबन पालवे पाटील, उपसरपंच श्री. सहदेव बबन खोमणे, माजी उपसरपंच श्री. राजेंद्र पोपट शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री. दत्तात्रेय शिवाजी ढोबळे, श्री. अमोल विलास शिंदे स्वागत करणार आहेत. लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे ग्रामपंचायत सदस्य श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महादेव भगवान पालवे पाटील आणि समस्त पालवे पाटील परिवार, मांडवे यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.