राजकारणसामाजिक

चि. विकासकुमार काळे, भांब आणि चि. सौ. कां. अनुराधा शेंडगे, नातेपुते यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार..

प्रमुख उपस्थिती
मा. आ. राम (भाऊ) सातपुते
माळशिरस विधानसभा
मा. आ. ॲड. रामहरी रुपनवर
विधान परिषद महाराष्ट्र
डॉ. पै. भैय्यासाहेब बंडगर
उपाध्यक्ष, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य.
किशोरभैय्या सुळ पाटील
उपसभापती, पंचायत समिती माळशिरस.

भांब (बारामती झटका)

स्व. रामा नाना काळे यांचे नातू व श्री. बाळासो रामा काळे, रा. भांब, पाटील वस्ती, ता. माळशिरस यांचे द्वितीय सुपुत्र चि. विकासकुमार व स्व. अण्णा तात्याबा शेंडगे यांची नात व श्री. अभिमान अण्णा शेंडगे रा. नातेपुते, ता. माळशिरस यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. अनुराधा यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. 02/06/2025 रोजी दुपारी 01 वाजून 22 मिनिटे या शुभमुहूर्तावर पाटील वस्ती, भांब, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. सदरच्या शाही शुभविवाह सोहळ्यास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार श्री. राम (भाऊ) सातपुते, विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, डॉ. पै. भैय्यासाहेब बंडगर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. किशोरभैय्या सुळ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. अंबादास रामा काळे सर, कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, पुणे उद्योजक श्री. धनाजी शंकर काळे शेठ, बृहन्मुंबई महानगरपालिका उप अभियंता श्री. तुषार यशवंत पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई सौ. पुष्पा रघुनाथ पालवे, कमांडो श्री. राजेंद्र सुनील तांबवे व समस्त काळे परिवार, भांब यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.

पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवांची, मुहूर्त क्षणाचा पण नाती आयुष्याची, आपला सहभाग क्षणाचा, पण आशीर्वाद कायमचा, नवदांपत्यास शुभ आशीर्वाद व सुमनांचा वर्षाव करण्याकरता आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आपले नम्र अंगणवाडी सेविका सौ. बायडाबाई व श्रीराम बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. बबन रामा काळे, भांब ग्रामपंचायत सदस्या सौ. संगीता व श्री. बाळासो रामा काळे, प्रा. सौ. आशा व प्रा. श्री. अंबादास रामा काळे व समस्त काळे परिवार भांब यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे स्वागतोत्सुक चि. अक्षयकुमार बबनराव काळे B.sc.Agri ( B.Tech) व जिल्हा परिषद बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता चि. अथर्व अंबादास काळे, समस्त काळे परिवार यांच्या वतीने नम्र विनंती आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button