चि. विशाल सोनमळे व चि. सौ. कां. निकिता घाडगे आणि चि. सौ. कां. हर्षा सोनमळे व चि. विशाल लोंढे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक – श्री, अर्जुन कृष्णा सोनमळे, श्री. हनुमंत कृष्णा सोनमळे, मु. पो. लोंढे मोहितेवाडी, ता. माळशिरस
नातेपुते (बारामती झटका)
सौ. राजेश्री व श्री. अर्जुन कृष्णा सोनमळे रा. लोंढे मोहितेवाडी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव विशाल व सौ. वैशाली व श्री. माधव निवृत्ती घाडगे रा. टाकळी, ता. माढा यांची सुकन्या चि. सौ. कां. निकिता आणि सौ. राजेश्री व श्री. अर्जुन कृष्णा सोनमळे रा. लोंढेमोहितेवाडी यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. हर्षा सोनमळे व सौ. रुक्मिणी व श्री. युवराज रघुनाथ लोंढे रा. लोंढे मोहितेवाडी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव विशाल यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. 23/08/2024 रोजी सायंकाळी 05 वाजून 23 मिनिटे या शुभमुहूर्तावर मधुर मिलन लॉन्स, पुणे-पंढरपूर हायवे, नातेपुते, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी लग्न कार्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रेषक श्री. अर्जुन कृष्णा सोनमळे, श्री. हनुमंत कृष्णा सोनमळे व सोनमळे परिवार लोंढे मोहितेवाडी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

केळीची कमान दारावर झुलणार, सनईच्या साक्षीने चौघडे बोलणार, हळद हळूच होणार ओली, अलगत झुलणार बाशिंग बहाळी, सावधान म्हणता अक्षदा पडणार, कुंकवावरती नाव उमटणार, जाईची वेणी अबोलीचा गजरा, वधु वर यांच्यावरती सर्वांच्या नजरा, अशा नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे, आपले नम्र सौ. राजेश्री व श्री. अर्जुन कृष्णा सोनमळे आणि समस्त सोनमळे परिवार लोंढे मोहितेवाडी यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे. लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणास आमंत्रण अथवा निमंत्रण मिळाल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त सोनमळे, घाडगे व लोंढे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.