चि. लक्ष्मण तरटे पाटील, डोईठाण व चि. सौ. कां. निकिता खरात पाटील, धोंडराई यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाह सोहळा होणार संपन्न
बीड (बारामती झटका)
कै. साहेबराव रंगनाथ तरटे पाटील यांचे नातू व श्री. दिलीपराव साहेबराव तरटे पाटील रा. डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड यांचे सुपुत्र चि. लक्ष्मण आणि श्री. संपतराव निळकंठराव खरात पाटील यांची पुतणी व श्री. सतीशराव निळकंठराव खरात पाटील रा. धोंडराई, ता. गेवराई, जि. बीड यांची सुकन्या चि. सौ. कां. निकिता यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. ०७/०३/२०२५ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मि. बेदरे लॉन्स गेवराई, जि. बीड येथे संपन्न होणार आहे. सदरचा शाही शुभविवाह सोहळा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
लग्न एक स्नेहबंध, रेशमी नातं जन्मजन्मांतरीच, असाच एक ऋणानुबंध सनई चौघड्याच्या सप्तसुरात, अग्निदेवता व कुलदेवतेला साक्षी ठेवून संपन्न होत आहे. आपल्या सानिध्यात हा आनंद सोहळा साजरा व्हावा व सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांना अक्षतारूपी शुभाशीर्वाद द्यावेत, असे नम्र आवाहन दिलीपराव साहेबराव तरटे पाटील, रामबापू पांडुरंग तरटे पाटील, भास्करराव साहेबराव तरटे पाटील, धनंजय साहेबराव तरटे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत नजर चुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त तरटे पाटील व खरात पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.