चोरट्याला पकडायला गेलो आणि खुनी सापडला !

१ कोटी कॅश पोलिसांच्या ताब्यात दिली
माळशिरस (बारामती झटका)
आज पहाटे सोलापूर जि. माळशिरस पो. स्टे. हद्दीत गोमांस वाहतूक होत आहे, अशी बातमी प्राप्त झाल्याने गोरक्षकांनी कंटेनर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतला. सदर कंटेनरची पोलिसांनी झडती घेतल्यानंतर अत्यंत धक्कादायक दृश्य दिसले. मासे सर्वत्र ठेवून मध्यभागी कॅरेटमध्ये नगदी रुपये १ कोटीचा ऐवज सापडला. एवढी मोठी रोख रक्कम कोठून आली व कोणत्या देश विघातक कृत्यासाठी वाहतूक होत होती, याचा तपास झाला पाहिजे. हा प्रकार गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी होऊन मूळ गुन्हेगारांना शासन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे केली. या घटनेत आम्ही सर्व गोरक्षक साक्षीदार असून पोलीस यंत्रणेसोबत सहकार्य करण्यास तयार आहोत, ते आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
दि. 06/07/2024 रोजी 21/00 वा 112 वरती कॉल आला होता की, 10 ते 12 लोकांनी आमची गाडी आडवलेली आहे. पोलीस मदत पाहीजे आहे. त्यावरुन पोकों/1333 रोकडे सदर ठिकाणी गेले असता त्यांना सदर ठिकाणी वाहन नंबर ए पी 31 टी एच 8729 हे वाहन होते. त्यावर चालक बिजयकुमार पाल हा होता व त्याचेबरोबर त्याचे जोडीदार चालक रमेश कुमार पाल होता व तेथे गाडी आडवणारे इसम नामे अमर दादा तोरणे, सचिन मोहन पिसे, विशाल वेताळ खुडे रा. माळशिरस, रणजित दादा तोरणे रा. निमगाव म., शरद धनंजय गाडे रा. फलटन, सागर प्रकाश देवकते रा. वेळापुर, ता. माळशिरस, यशवंत बाजीराव देशमुख रा. माळशिरस, रणजित यशवंत मोहीते रा. खुडुस असे होते. त्यांनी पोलीसांना कळविले की, आम्ही गोरक्षक आहोत व सदर वाहनामध्ये गोमांस वाहतुक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहीती मिळालेली आहे. त्यावरुन सदर वाहन पोकॉ/1333 रोकडे यांनी माळशिरस पोलीस ठाणेस आणले. सदर वाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे उपस्थितीत तसेच पोलीस ठाणे अंमलदार पोना/ 1177 दत्तात्रय खरात, पोहेकाँ 106 बोंद्रे, पोका/1333 रोकडे, पोकों/18 वैभव माळी, पोका /2198 बोराटे, पोहेकाँ/ 706 राहुल रुपनवर यांचे उपस्थित व वरील गोरक्षक साक्षीदार यांनी सदर वाहनामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी वाहन चेक करण्यासाठी व्हिडिओ शूटिंगमध्ये गोरक्षक साक्षीदार व पंच यांनी सदर वाहन चालक यांचे समक्ष चेक केले. सदर वाहनात झिंगा (कोळंबी) मच्छीची ट्रे दिसत होते. सदरचे ट्रे चेक करीत असताना एका ट्रेमध्ये एक बॉक्स आढळून आला. सदर बॉक्समध्ये चलनी नोटा असल्याचे दिसले. त्यानंतर सदर चलनी नोटा लाईटचे उजेडात पोलीस निरीक्षक कक्षामध्ये पंच व गोरक्षक साक्षीदार तसेच वाहन चालक यांचे समक्ष चेक केले असता सदर बॉक्समध्ये 500 रु. दराच्या चलनी नोटा एका बंडलमध्ये 50 हजाराचे 05 बंडल असे 2,50,000/ रु. चे असे एकूण 40 बंडल एकुण 01 कोटी रुपये अंदाजे किंमत मिळून आली आहे. सदर कारवाईचा व्हिडिओ शूटिंगमध्ये पंचनामा करून सदर रक्कम एका कागदी बॉक्समध्ये सील करून ठेवली आहे. सदर रकमेबाबत सदर वाहन मालक यांना पोलिसांनी फोनद्वारे विचारणा केली असता सदर बाबत त्यांनी योग्य स्पष्टीकरण न दिल्याने सदरबाबत पुढील कारवाईसाठी आयकर विभाग यांच्याकडे रिपोर्ट पाठवण्यात आलेला आहे. पुढील कारवाई आयकर विभाग करत आहे.

गाडी पकडल्यानंतर कसाई म्हणतात, गोरक्षकांनी आमचे मोबाईल किंवा पैसे काढून घेतले पण आज एवढे पैसे समोर असताना एकाही पैशाला हात न लावता गोरक्षकांनी दाखवून दिले कि, कसाई हे बिनबुडाचे व खोटे आरोप करत असतात. सर्व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रणजीत तोरणे, सागर देवकाते, रणजित मोहिते, यशोदिप इंगोवले, सुनील माने, राहुल दनाने, बाबा केंगार इ. गोरक्षकांचे अभिनंदन केले.
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमचे आणि गृहखात्याचे तसेच पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे साहेब व माळशीरस पोलीस स्टेशनचे पीआय श्री. नारायण पवार साहेब यांचे हार्दिक अभिनंदन !
आपला नम्र,
शिवशंकर स्वामी

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.