चौकशी अधिकाऱ्यांचीच चौकशी करून मूळ तक्रारीची त्रिसमितीय सदस्य नेमून श्री. राजेंद्र काकडे यांची चौकशी करावी…

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची त्रिसमितीय सदस्य नेमून चौकशी करावी यासाठी श्रीनिवास कदम पाटील यांचे साकडे….
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनल संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी मेल द्वारे व पत्रव्यवहार करून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीसाठी नेमलेले सहाय्यक निबंधक श्री. शिंदे यांनी राजकीय दबाव व अर्थपूर्ण व्यवहारामुळे सखोल चौकशी न करता घाईघाईने रेकॉर्ड प्रत्यक्ष न तपासता अहवाल दिलेला आहे. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांचीच चौकशी करून मूळ तक्रारीच्या अनुषंगाने त्रिसमितीय सदस्य नेमून कसून चौकशी करावी असा पत्रव्यवहार केलेला आहे.
श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी दिलेल्या पत्रामध्ये, उपरोक्त विषयांस अनुसरून आपणाकडे रीतसर तक्रारी अर्ज करितो की, पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती ता. माळशिरस या बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची नियुक्ती, सचिव पदाची बढती व सचिव कार्यकालात केलेल्या कामांची चौकशी, व्यापारी गाळे, अधिकारी व कर्मचारी कायम व रोजंदारी याची सखोल चौकशी करावी असा तक्रारी अर्ज दिलेला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पणन संचालक यांनी जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांच्याकडे तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे पत्रव्यवहार केलेले होते. जिल्हा उपनिबंधक यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज माळशिरस श्री. शिंदे यांच्याकडे तक्रारी अर्ज वर्ग केलेला होता. सहाय्यक निबंधक श्री. शिंदे यांनी राजकीय दबाव व अर्थपूर्ण व्यवहारामुळे चौकशी अहवाल सखोल चौकशी न करता दिलेला आहे. तरी माझी आपणांस विनंती आहे, चौकशी अधिकारी श्री. शिंदे यांची चौकशी करून मूळ तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची त्रिसमितीय सदस्य नेमून चौकशी करावी, अशी आपणांस नम्र व कळकळीची विनंती आहे..

दि. 24/02/2025 रोजीच्या पणन संचालक यांच्याकडील तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांनी सहायक निबंधक अकलूज यांना चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले असता निबंधक श्री. शिंदे यांनी घाईघाईने रेकॉर्ड प्रत्यक्ष न तपासता अहवाल दिलेला आहे. दिलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता सदरच्या अहवालामध्ये चुकीच्या बाबींविषयी स्पष्ट अहवाल देणे गरजेचे होते परंतु, तोसुद्धा अहवाल चुकीच्याच पद्धतीने दिलेला आहे.
सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांना बाजार समितीने ठराव घेऊन व तेव्हा सिनियर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना डावलून सचिव केल्याचा ठराव केला. त्याला पणन संचालकांची परवानगी न घेता जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेतली व सचिव म्हणून अनेक वर्ष काम केले. मुळात ती नेमणूकच चुकीची आहे, असे चौकशी अहवालाच्या कागदपत्रावरून दिसते पण, याबद्दल कुठलाही आक्षेप सहायक निबंधकने घेतला नाही फक्त चौकशीचा फार्स केला.
अहवालत स्पष्ट म्हटले कि, रोजंदारी कर्मचाऱ्याची परवानगी जिल्हा उपनिबंधक कडून घेतली नाही पण, त्याबद्दल कारवाई मात्र जिल्हा उपनिबंधक यांनी केलेली नाही. गाळेवाटपच्या मुद्द्याची कुठलीही शहानिशा न करता क्लीन चिट चौकशी अधिकाऱ्याने दिलेली आहे. कार्यालयीन कामकाज, विकासकामे यांची सखोल चौकशी केलेली नाही. त्यामुळे सदर चौकशी अहवाल मान्य असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समितीकडून सखोल चौकशी करावी. सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे सध्या वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना रोजंदारीवर पुन्हा कामावर घेण्यासाठी बाजार समितीने ठराव केलेला आहे. त्यामुळे चौकशी अधिकारी यांनी राजकीय दबाव व आर्थिक हित संबंधामुळे सकारात्मक चौकशी अहवाल दिलेला आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, पणन मंत्री ना. जयकुमार रावल, पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, यांनी तक्रारीची योग्य दखल घेऊन आपल्या स्तरावर त्रिसमितीय सदस्य नेमून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची चौकशी करावी अशी आपणांस नम्र व कळकळीची विनंती आहे.

वरिष्ठ पातळीवरून पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे त्रिसमितीय सदस्य नेमून चौकशी करण्याचे आदेश दिल्यास पणन संचालक यांनी जिल्हा उपनिबंधक सोलापूर व सहाय्यक निबंधक अकलूज यांना त्रिसमितीय सदस्य चौकशीमध्ये घेऊ नये अन्य जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांची त्रीसमिती सदस्य नेमून चौकशी करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं जाईल, होणाऱ्या सर्व परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा



