चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. निर्मला बाळासाहेब साखळकर यांचे दुःखद निधन…

मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांना मातृषोक…
चौंडेश्वरवाडी (बारामती झटका)
चौंडेश्वरवाडी, ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. निर्मला बाळासाहेब साखळकर यांचे वयाच्या 55 व्या वर्षी सोमवार दि. 25/08/2025 रोजी सायंकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वयक व चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. धनाजी साखळकर व ग्रामपंचायत सदस्य नितीन साखळकर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर चौंडेश्वरवाडी गावातील राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये रात्री अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम बुधवार दि. 27/08/2025 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराने चौंडेश्वरवाडी गावांमध्ये सामाजिक व राजकीय कार्य साखळकर परिवार यांनी केलेले आहे. चौंडेश्वरवाडी गावचे उपसरपंच पद धनाजी साखळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य निर्मला साखळकर व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन साखळकर यांनी या पदातून गावच्या विकासाच्या जडणघडणीत मोलाचे कार्य केलेले आहे.

आनंदनगर येथील बाबुराव वाघमारे यांच्या कन्या निर्मला यांचा विवाह चौंडेश्वरवाडी येथील बाळासाहेब साखळकर यांच्याशी 1981 साली झालेला होता. संस्कारीक वाघमारे घराण्यामधून आलेल्या निर्मला यांनी प्रतिकूल परिस्थितीत कष्टावर आपल्या दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला आहे. निर्मला यांना मुलगी नाही मात्र त्यांनी सुनांना आपल्याच मुली मानून चांगल्या पद्धतीने साखळकर परिवारांचा संसार सुरू होता. नातवंडांच्या वाढदिवसाला आजीच्या आनंदाला पारावर उरत नव्हता. सुसंस्कृत स्वभाव व धार्मिक वृत्तीच्या असणाऱ्या मातोश्री यांच्या अकाली मृत्यूने साखळकर परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. साखळकर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय सौ. निर्मला यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



