ताज्या बातम्याराजकारण

दादा आणि भाऊ एका पराभवाने अस्तित्व संपणाऱ्यातले तुम्ही नेते नाही, कट्टर होतो आणि कट्टरच राहील कायम एकनिष्ठ.

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा निवडणुकीत पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर उर्फ दादा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते उर्फ भाऊ तुम्हा दोघांचा लोकसभेतील जनमताचा आदर करून पराभव मान्य आहे. मात्र दादा आणि भाऊ एका पराभवाने अस्तित्व संपणार, यातले तुम्ही नेते नाही. कट्टर होतो आणि कट्टरच राहील कायम एकनिष्ठ असे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यापैकी श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मु. पो. मळोली, ता. माळशिरस मी सुद्धा आहे.

दादा आणि भाऊ तुम्ही माळशिरस तालुक्याच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्याचे काम केले. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. कायम जनतेच्या मनात आपल्या विकासकामांची आठवण राहणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरीसुद्धा भविष्यामध्ये आपले राजकीय भविष्य बहरणार आहे. यामध्ये माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही.

आपण लोकप्रतिनिधी असताना जी मनामध्ये आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा, मित्रत्वाचं नातं होतं तसंच कायम राहील, कट्टर होतो आणि कट्टरच राहील कायम एकनिष्ठ राहणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button