दादासाहेब तुमचा पाठीवर हात कायम असू द्या, शंभर हत्तीचे बळ मिळून जनतेची सेवा करण्यास ऊर्जा मिळते…
पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे यांच्या निवडीचे स्वागत केले…
माळशिरस (बारामती झटका)
पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज भैय्या पुकळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत असताना पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवराजभैय्या पुकळे यांच्या खांद्यावर हात ठेवून, भविष्यामध्ये आपण भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे तळागळात पोचविण्यासाठी काम करावे, आपल्याला भविष्य उज्वल आहे, असे सांगताच, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी दादासाहेब, तुमचा पाठीवर हात कायम असू द्या. शंभर हत्तीचं बळ मिळून जनतेची सेवा करण्यास ऊर्जा मिळते, असे सूचक वाक्य शिवराजभैय्या यांनी उद्गारले.
यावेळी फलटण कोरेगाव मतदार संघाचे लोकप्रिय नेतृत्व सचिन कांबळे पाटील, युवा नेते मनोज कांबळे पाटील, भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुका सरचिटणीस स्वप्निलकुमार राऊत, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी उपस्थित होते.
औपचारिक चर्चा करताना पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवराज पुकळे यांना मिळालेल्या संधीचे सोने करून घ्या, यासाठी संघटनात्मक कानमंत्र देण्यात आले. पुढे बोलताना शिवराज पुकळे यांनी सांगितले, दादासाहेब आपल्यासारख्या कार्यकर्तृत्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारीची सुवर्णसंधी मिळालेली आहे. निश्चितपणे या मिळालेल्या संधीचे सोने करून समाजामध्ये युवा मोर्चाची ताकद वाढवून गावोगावी वाड्यावर कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून आपण व पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम करणार असल्याचे सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Afer looking into a handful of thee blog posts oon yoour wweb page, I seriously appreciate your techniue oof wriuting a blog.
I dded itt to my bookmark website list andd wiill bbe
checking baack soon. Takee a look aat mmy website as well annd let me kniw how you feel.