दहावी व बारावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर…

मुंबई (बारामती झटका)
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वी – १२ वीच्या २१ लाख विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली आहे. या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. १५ मे पर्यंत निकाल लागू शकतो. मात्र, यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे.
यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत १२ वीची परीक्षा झाली होती. यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती १७ मार्चपर्यंत होती. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (१०वी, १२वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल. लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे.
कुठे पाहता येणार निकाल ?
http://mahahsscboard.in
http://mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
http://msbshse.co.in
http://mh-ssc.ac.in
http://sscboardpune.in/
http://sscresult.mkcl.org/
http://hsc.mahresults.org.in/
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.