ताज्या बातम्या

दहिगाव गावात श्रीकृष्णाच्या काळातील गोकुळ अवतरणार…

दहिगाव (बारामती झटका)

सौ‌. सौदामिनी व श्री. राहुल अरुण सावंत यांच्या मुलाचे नामकरण (बारसे) कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. ३१/०१/२०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमास आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी, काका-मावशी, दादा-वहिनी, बहु ताई, आत्या यांच्यासह चिमुकल्यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने श्रीकृष्णाच्या काळातील दहिगाव गावाला गोकुळ नगरचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

नामकरण बारसे समारंभाची जय्यत तयारी सुरू असून सदरच्या कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, यासाठी समाजसेविका सौ. पुष्पा अरुण सावंत, दहिगाव गावचे माजी सरपंच श्री. अरुण देवबा सावंत, दहिगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी संदीप सावंत, दहिगाव गावचे माजी उपसरपंच श्री. संदीप अरुण सावंत, सौ. स्वाती प्रवीण चिकणे, श्री. प्रवीण वसंत चिकणे, सौ. सौदामिनी राहुल सावंत, श्री. राहुल अरुण सावंत, कुमारी सारंगी संदीप सावंत, कुमारी भाग्यश्री प्रवीण चिकणे, कुमारी आर्या राहुल सावंत, चिरंजीव पुष्कर संदीप सावंत, कुमारी शिवांजली प्रवीण चिकणे यांच्यावतीने कार्यक्रमास आमच्या घरी अवश्य यायचं हं. अहो, पण एवढे आग्रहाचे निमंत्रण देणारा मी कोण असा प्रश्न आपणांस पडला असेल. अहो हे ठरविण्याकरिताच तर आपणास नामकरण विधी करता आमंत्रित करीत आहोत, असे सावंत व चिकणे परिवारांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button