ताज्या बातम्याराजकारण

दहिगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगलेला आहे.

नारीशक्ती ग्रामविकास पॅनलमध्ये अरुणतात्या सावंत, शरदबापू मोरे, रणधीर पाटील, बाळासाहेब कदम एकत्र आल्याने मतदारात उलटसुलट चर्चा सुरू

दहिगाव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची व प्रतिष्ठेची असणारी दहिगाव ग्रामपंचायत आहे. दहिगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच नारीशक्ती ग्रामविकास पॅनलमध्ये ज्येष्ठ नेते अरुणतात्या सावंत, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरद बापू मोरे, विद्यमान सरपंच रणधीर पाटील, युवा नेते बाळासाहेब कदम यांच्यासह अनेकजण एकत्र येऊन पॅनल उभा केलेला आहे. तर प्रगत शिक्षण संस्थेचे दहिगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक मुकूंद मोरे सर व गावातील छोटे गाव पुढारी व सर्वसामान्य मतदारांनी मिळून परिवर्तन ग्रामविकास पॅनल उभा करून निवडणूक सुरू आहे. सर्व राजकीय मातब्बर नेते मंडळी व आर्थिक दृष्ट्या सधन असणारी मंडळी एका बाजूला व सर्वसामान्य व गोरगरीब जनता एका बाजूला असे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती निवडणूक दहिगाव पंचवार्षिक निवडणुकीत चित्र पाहावयास मिळत आहे.

माळशिरस तालुक्याच्या व सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दहिगाव गावाचे नाव आहे. गावामध्ये राजकीय नेत्यांचे गट तट आहेत‌. अनेकवेळा एकमेकांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये आमने सामने उभे राहिलेले आहेत. त्यामुळे गावामध्ये राजकीय नेत्यांसाठी सर्वसामान्य जनता व मतदार यांच्यामध्ये गट तट पडलेले आहेत. असे असल्यामुळे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत नारीशक्ती पॅनलच्या माध्यमातून सर्व राजकीय नर एकत्र आलेले असल्याने गट तट पडलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला व मतदारांना पसंत नाही. राजकीय स्वार्थापोटी नेते मंडळी एकत्र आले आहेत. सर्वसामान्य जनता व मतदारांच्या हितासाठी एकत्र आलेले नाहीत. यासाठी परिवर्तन ग्रामविकास पॅनलची स्थापना मुख्याध्यापक मुकूंद मोरे सर व गावातील अनेक विस्थापित नेते एकत्र येऊन पॅनल उभा केलेला आहे. दहिगाव गावातील अनेक तरुण मतदार यांचे मुकूंद मोरे सर गुरुवर्य आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी गुरुवर्य शिक्षक मुकूंद मोरे सर यांच्या पॅनलला मत देऊन गुरुदक्षिणा देण्याच्या मानसिकतेत आहेत. भले समोरच्या पार्टीकडून दक्षिणा घेऊन मतदान मात्र गुरूला करायचे अशी मतदारांमध्ये कुजबुज सुरू आहे.

दहिगाव ग्रामपंचायतीमधील क्रमांक ३ मधील फुले रामचंद्र काशिनाथ व फुले आशाताई संभाजी यांनी नारीशक्ती पॅनल मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. त्यांच्या विरोधात परिवर्तन विकास पॅनल यांनी उमेदवारी अर्ज न भरून दोन उमेदवारांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान दिलेला आहे. त्यामुळे त्याची सहानुभूती व फायदा परिवर्तन ग्रामविकास पॅनलला आपोआप होत असल्याचे चित्र दिसत आहे. गावठाणाबरोबर ग्रामपंचायत हद्दीतील इतर वाड्यावर मतदारांमधून राजकीय नेतेमंडळी एकत्र येऊन पॅनल उभा केलेला असल्याने मतदारांना पसंत नाही त्यामुळे परिवर्तन ग्रामविकास पॅनलला छुपा वाढता पाठिंबा मिळत आहे. शेवटी निवडणूक आहे मतदार राजा असतो, त्यामुळे नारीशक्ती ग्रामविकास पॅनल का परिवर्तन ग्रामविकास पॅनल मधील थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पसंती मिळते, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

  1. Great job on this piece! It was very informative and engaging. I’m eager to hear different perspectives on this. Click on my nickname for more engaging content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button